म.ए.युवा समिती आणि राज्य मराठी विकास संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने वकृत्व स्पर्धा.

बेलगाम प्राईड/ महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, बेळगाव आणि राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने, अभिजात मराठी भाषा सप्ताहाचे औचित्य साधून ‘वक्तृत्व स्पर्धे’चे आयोजन रविवार, दिनांक ११ ऑक्टोबर २०२६ रोजी वरेरकर नाट्य मंदिर, टिळकवाडी, बेळगाव येथे करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांमधील व्यासपीठ-धैर्य वाढावे, त्यांचा आत्मविश्वास वाढावा, वक्तृत्वकला जोपासावी आणि आपले विचार श्रोत्यांसमोर प्रभावीपणे मांडता यावेत, यासाठी प्राथमिक (४ थी ते ७ वी), माध्यमिक (८ वी ते १० वी) आणि महाविद्यालयीन (११ वी ते पदव्युत्तर) अशा तीन गटांमध्ये ही स्पर्धा घेण्यात येणार आहे.
वक्तृत्व स्पर्धेसाठी गट आणि विषय खालीलप्रमाणे
प्राथमिक गट – १) मोबाईल गेम की मैदानी खेळ? २) माझी प्रेरणा: छत्रपती शिवाजी महाराज. ३) मी शिक्षणमंत्री झालो/झाले तर? ४) मातृभाषेतून शिक्षण: काळाची गरज
माध्यमिक गट –
१) मोबाईल स्मार्टफोन: मानवाचा सेवक की मालक? २) शेती आणि शेतकऱ्यांपुढील आव्हाने. ३) मराठी भाषा टिकविण्यासाठी माझे योगदान. ४) पर्यावरण संवर्धन: आजची गरज, उद्याची जबाबदारी
महाविद्यालयीन गट – १) कृत्रिम बुद्धिमत्ता (AI): काळाची गरज की भविष्यातील धोका? २) जेन-झी आंदोलन: नव्या काळातील क्रांती? ३) मराठी भाषा संवर्धन: युवकांची भूमिका. ४) डिजिटल भारत: संधी, आव्हाने आणि भविष्य
(वरील ४ पैकी एका विषयाची निवड करावी.)
*बक्षिसाचे स्वरूप:* प्रमाणपत्र, मानचिन्ह आणि रोख रक्कम असे असेल.
इच्छुक स्पर्धकांनी शनिवार, दिनांक १० ऑक्टोबर २०२६ पर्यंत युवा समिती कार्यालय, टिळकवाडी, बेळगाव येथे किंवा खालील पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून नावनोंदणी करणे आवश्यक आहे.
(प्रत्येक गटासाठी पहिल्या ३० स्पर्धकांनाच प्रवेश असेल, याची नोंद घ्यावी.) श्रीकांत कदम – 7019668025. प्रतीक पाटील – 7338145673. आशिष कोचेरी – 9886103373
अधिक माहितीसाठी संपर्क – अध्यक्ष – अंकुश केसरकर – 9739963229. महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, बेळगाव




