
बेलगाम प्राईड/ गणेशोत्सवाचे औचित्य साधून २२ सप्टेंबर रोजी प्रभागात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात मोफत नेत्र तपासणी, आवश्यक शस्त्रक्रियेसाठी मार्गदर्शन तसेच हाडांची घनता (Bone Density) तपासणी करण्यात आली.
या शिबिरात दोन तज्ज्ञ डॉक्टरांनी नागरिकांची तपासणी करून दैनंदिन जीवनात आरोग्याची काळजी कशी घ्यावी, आहार व जीवनशैलीत कोणत्या बाबींची काळजी घ्यावी, याबाबत मार्गदर्शन केले. सकाळच्या सत्रात आयोजित करण्यात आलेल्या नेत्र तपासणी शिबिरात सुमारे ६८ नागरिकांनी सहभाग घेतला. तपासणीनंतर गरज असलेल्या सुमारे १० नागरिकांवर मोफत उपचार व शस्त्रक्रिया करून देण्यात येणार आहे.
यानंतर दुपारी आयोजित करण्यात आलेल्या हाडांची घनता तपासणी शिबिरात सुमारे ५४ नागरिकांनी सहभाग घेतला. नागरिकांनी या मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घेत डॉक्टरांकडून आवश्यक आरोग्यविषयक सल्ला व मार्गदर्शन घेतले.गणेशोत्सवाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या आरोग्य शिबिरामुळे परिसरातील नागरिकांना मोफत आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध झाली.




