Uncategorized
Trending

प्रादेशिक आयुक्त के. एम. जानकी यांची शांताई वृद्धाश्रमाला भेट; ज्येष्ठ नागरिकांशी साधला संवाद

बेलगाम प्राईड/ बेळगाव विभागाच्या प्रादेशिक आयुक्त के. एम. जानकी (IAS) यांनी शांताई वृद्धाश्रमाला भेट देऊन तेथील ज्येष्ठ नागरिकांशी आपुलकीने संवाद साधला. यावेळी त्यांनी वृद्धाश्रमातील रहिवाशांची आस्थेने विचारपूस करत त्यांच्यासोबत काही वेळ घालवला.

या भेटीदरम्यान प्रादेशिक आयुक्त जानकी यांनी वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांची तब्येत आणि त्यांच्या राहणीमानाबाबत माहिती घेतली. त्यांच्याशी संवाद साधत प्रेमाचे आणि जिव्हाळ्याचे क्षण अनुभवले. त्यांच्या या भेटीमुळे वृद्धाश्रमातील रहिवाशांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

याप्रसंगी माजी महापौर विजय मोरे, मारिया मोरे आणि संतोष ममदापूर यांच्या हस्ते प्रादेशिक आयुक्त के. एम. जानकी यांचा सन्मान करून त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी विजय मेत्राणी, लीला शहा यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

ज्येष्ठ नागरिकांप्रती प्रेम, आदर, आपुलकी आणि संवेदनशीलता जपण्याचे महत्त्व या भेटीतून अधोरेखित झाले. समाजातील ज्येष्ठ व्यक्तींना सन्मानाने आणि जिव्हाळ्याने वागविण्यासोबतच त्यांच्यासाठी वेळ देणे किती महत्त्वाचे आहे, याचा संदेशही या भेटीतून देण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!