Uncategorized

पोलिस आयुक्तांनी दाखवली माणुसकी : अपघातातील जखमीला मदत

बेलगाम प्राईड /बेळगाव शहरात सोमवारी रात्री झालेल्या एका अपघातात पोलिस आयुक्त भूषण गुलाबराव बोरासे यांनी कर्तव्यापलीकडे जाऊन माणुसकी दाखवली बी. शंकरानंद मार्गावर दुचाकी आणि कारची समोरासमोर टक्कर होऊन एक जण जखमी झाला. अपघातानंतर कांही क्षणातच घटनास्थळी पोहोचलेल्या पोलीस आयुक्तांनी जखमी तरुणाला त्यांच्या सरकारी वाहनातून जिल्हा रुग्णालयात दाखल करून उपचाराची व्यवस्था करण्याद्वारे एक आदर्श निर्माण केला.

प्रणोष सुरनागी असे अपघातातील जखमीचे नाव असून गणेशपूर येथील रहिवासी आहे. शहरातील बी. शंकरानंद मार्गावर (क्लब रोड) येथे सोमवारी रात्री 9 वाजता प्रणोषा सुरनागी त्यांच्या दुचाकीवरून कंग्राळी खुर्द गावाकडे जात होते. त्यावेळी समोरून येणाऱ्या एका कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले. ही घटना वाहतूक उत्तर पोलीस स्थानकाच्या एपीएमसी पोलीस हद्दीत घडली.

सदर अपघाताची घटना रस्त्यावरून जाताणा आयुक्त भूषण बोरासे यांच्या निदर्शनास आली त्वरित त्यांनी वाहनातून उतरून जखमीची विचारपूस केली. तसेच जखमीला कोणताही विलंब न करता स्वतःच्या सरकारी वाहनातून त्याला रुग्णालयात नेले. जखमी तरुणाला तातडीने उपचार मिळावेत यासाठी त्यांनी वेळेवर दिलेल्या प्रतिसादाचे आणि मानवतावादी चिंतेचे घटनास्थळी जमलेल्या जनतेने कौतुक केले. पोलिस आयुक्तांचे हे पाऊल त्यांची समाजाप्रती असलेली वचनबद्धता आणि काळजी अधोरेखित करते. त्यांनी संकटात सापडलेल्यांना मदत करून ते केवळ कायदा पाळणारेच नाहीत तर खरे लोकाभिमुख पोलिस अधिकारी आहेत हे सिद्ध केले आहे. त्यांचे हे काम संपूर्ण पोलिस विभागासाठी अभिमानाची बाब आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!