Uncategorized
Trending

बेनॉन स्मिथ कॉलेजसमोर पहाटे भलेमोठे झाड कोसळले

सुदैवाने कोणतीही जीवितहानी टळली

बेलगाम प्राईड/ कॅम्प परिसरातील बेनॉन स्मिथ कॉलेजसमोर आज पहाटे सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास एक भलेमोठे झाड अचानक कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

बेनॉन स्मिथ कॉलेजसमोरील या परिसरात दिवसभर विद्यार्थी, पादचारी आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. अशा गजबजलेल्या ठिकाणी झाड कोसळल्याने काही काळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले. पहाटेच्या वेळी ही घटना घडल्यामुळे मोठी दुर्घटना टळली असून, दिवसा ही घटना घडली असती तर गंभीर अनर्थ होण्याची शक्यता होती.

या घटनेमुळे परिसरातील धोकादायक व जुनाट झाडांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी संबंधित प्रशासनाने परिसरातील झाडांची पाहणी करून धोकादायक झाडांबाबत आवश्यक ती खबरदारी घ्यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!