Uncategorized
Trending

सुरुतेची त्रिनेत्रा भारत खनगावकर हिची कर्नाटक राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

बेलगाम प्राईड/ सेंट पॉल इंग्लिश मीडियम हाय स्कूल बेळगुंदी यांची विद्यार्थिनी त्रिनेत्रा भारत खनगावकर हिने डिपार्टमेंट ऑफ स्कूल एज्युकेशन बेळगाव डिस्ट्रिक्ट लेव्हल कराटे स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक घेऊन उल्लेखनीय कामगिरी केली. आणि तिची आता कर्नाटक राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

त्रिनेत्रा खनगावकर हिच्या यशाबद्दल सुरुते गावातील ग्रामस्थ व तरुण मंडळांने तिचे स्वागत केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनीनी क्रीडा क्षेत्रातील उत्तम कामगिरी करून गावचे नाव उज्वल करावे असा संदेश भरमू आपटेकर, मधु पाटील, भरमू चौगुले, दत्तू शेट्टीये आणि हेमंत पाटील यांनी दिला आहे.

त्रिनत्रा खणगावकर हिच्या यशामागे तिचे कराटे स्पोर्ट्स अकॅडमी चे मुख्य मार्गदर्शक चंदन जोशी, नागराज जोशी तसेच मार्गदर्शिका करुणा पाटील यांचे तिला मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!