Uncategorized
Trending

गणेश विसर्जन दिवशी झालेल्या वादाचे परिवर्तन हाणामारीत 

दोन्ही गटातील सहा जण जखमी इतर फरारी

बेलगाम प्राईड/ गणपती विसर्जन मिरवणुकी वेळी शुल्लक कारणावरून उद्भवलेल्या भांडणाचे रूपांतर दोन गटांमध्ये शस्त्रास्त्राने हल्ला करण्यात आल्याचा प्रकार रविवारी रात्री अकरा वाजण्याच्या दरम्यान टिंगिनकर गल्ली येथे घडली. या हल्ल्यामध्ये खडक गल्ली या दोन गल्ल्यांमधील सात ते आठ जण जखमी झाल्याचा प्रकार घडला आहे. 

या घटनेबाबतची सविस्तर माहिती अशी की अनंत चतुर्थी दिवशी गणेश मूर्ती विसर्जनच्या वेळी या दोन गल्लीतील युवकांमध्ये वादावादी निर्माण झाला होता. याचे परिवर्तन रविवारी रात्री दोन गटात हाणामारी होऊन एकमेकांवर हल्ला करण्यात आला या घटनेत खडक गल्लीतील तीन युवक तर टेंगिणकर गल्ली येथील तीन युवक जखमी झाले आहेत. या सर्व जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आला आहे.

या घटनेवरून पोलिसांनी रात्री खडक गल्ली येथे पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली त्यावेळी संपूर्ण गल्ली शुकशुकाट झाली होती. या घटनेचा गुन्हा मार्केट पोलीस ठाण्यात नोंद झाला असून पोलिसांनी या युवकांची तपासणी करण्यास गेले असता हे युवक फरारी झाले होते यासाठी पोलिसांनी त्यांच्या वडिलांना आणून पोलीस ठाण्यात दाबून ठेवण्यात आले होते.

या महाराणीच्या घटनेतील संशयित सुजल कोळी, अक्षय गडकरी, संकेत अष्टेकर, राजू शेडगे, विशाल तहसीलदार, सतीश घसारी, विनीत बडमनजी, टेंगिणकर गल्लीतील हे युवक फरारी झाले आहेत. तर खडक गल्लीतील रोहित शिंदे, ओंकार महेंद्र शिंदे, आदित्य राजू आळवणी, यश गायकवाड, प्रसाद शिरोळकर, गौरेश चव्हाण, विकास चौगुले, वैभव अष्टेकर, मनोज नायक, विष्णू लोहार, निकेश उर्फ पिंटू कांबळे, अन्यथा ते पंधरा जण फरारी झाले आहेत.

मार्केटचे पोलीस निरीक्षक काली मिरची यांनी सीसीटीव्ही च्या फुटेजनुसार राजू शेडगे (वय 25) विशाल तुकाराम तहसीलदार (वय 41) सतीश नंदू घसारी ( वय 46 ) विनीत विनायक बडमनजी (वय 18) दोघेही राहणार ठेंगिनगर गल्ली यांना अटक केले आहे तर दुसऱ्या गटातील सुजाल साहेबराव कोळी (वय 22) जालगार गल्ली संतराम गडकरी (वय 27) रा. खडक गल्ली व संकेत किरण अष्टेकर (वय 24) रा. खडक गल्ली यांना अटक करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!