सदाशिव नगर येथील १२ वर्षीय अमोल कडीमणीचे अपहरण
अपहरण केलेल्या बालकाला मारबड करून महामार्गावर सोडून अपहरणकर्ते फरारी

बेलगाम प्राईड/ सदाशिवनगर परिसरात राहणारा अमोल अतुल कडेमणी (वय १२) या मुलाचे अपहरण करण्यात आले होते. याचा शोधा शोध सुरू असतानाच अपहरणकर्त्यांनी त्याला मारबडव करून राष्ट्रीय महामार्गावर सोडून अपहरणकर्ते फरारी झाले. अशी माहिती त्या मुलाने सांगितली.
अमोल कडीमणी हा मुलगा सदाशिवनगर दुसरा मेन, सहावा क्रॉस परिसरात राहत असून हा सकाळी घराशेजारी असलेल्या दुकानात वेफर्स आणण्यासाठी गेला होता. त्यावेळी त्या दुकानात न मिळाल्याने शेजारच्या दुकानात जातेवेळी काळया रंगाच्या एका चार चाकी वाहनातून चार-पाच व्यक्तीने तुझ्या वडिलांचे आपण मित्र असल्याचे सांगून त्या युवकाच्या तोंडाला कापड लावून त्या वाहनातून त्याला पळून नेले होते. अपहरणकर्त्यांनी आपल्या तोंडाला मास्क बांधण्यात आले होते असेही त्या अपहरण करत्या मुलाने माहिती देताना सांगितले.
त्यावेळी तो युवक काही वेळासाठी बेशुद्ध पडला होता थोड्यावेळात शुद्धीवर येतात त्यांनी पाहिले असता तीन-चार युवक या वाहनात होते त्यांनी आपली ओळख लागू नये म्हणून तोंडाला मास्क बांधले होते. त्या युवकाला काही नजीक असलेल्या एका बेसमेंट परिसरात नेऊन त्यानंतर त्याला राष्ट्रीय महामार्ग म्हणजेच किल्ला तलावा नासिक असलेल्या ब्रिजच्या ठिकाणी गाडीतून सोडून देऊन अपहरणकर्ते फरारी झाले. यापूर्वी त्यांनी परत आणखीन एकदा येईल आणि तुला पळवून नेऊ असे धमकीही देण्यात आली अशी माहिती अपहरण करता अमोल या मुलाने सांगितले.
हा मुलगा तिथून आपल्या घरी जाण्यासाठी काही लोकांची मदत मागून सोडण्याची विनंती केली असता एकाने त्याला महानगरपालिके नजीक सोडले. यानंतर त्यांच्या घरच्या परिसरातील असलेले नगरसेवक संदीप जिरग्याळ यांनी त्यांच्या घरापर्यंत नेऊन सोडले. अपहरण झाल्याची माहिती सोशल मीडियावर प्रसिद्ध झाली होती.अपहरण झाल्यानंतर काही तासांनीच हा मुलगा आपल्या पालकांना मिळाला त्यावेळी तो खूप घाबरलेल्या अवस्थेत होता. हा मुलगा बेपत्ता झाली असल्याची तक्रार एपीएमसी पोलीस ठाण्यात करण्यात आली होती.
वाहनांना संपूर्ण काळी स्टीकर लावून बंदिस्त ठेवण्यासाठी परवाना नसतानाही शहर परिसरात काळया रंगाच्या गाड्यांवर काचेलाही काळया रंगाची स्टिकर लावून शहरामध्ये वाहने फिरतात अशा वाहनांवर पोलीस अधिकाऱ्याने तातडीने दखल घेऊन या वाहनांचे स्टिकर हटवण्यात यावे अशी ही माहिती जागृत नागरिकांनी व्यक्त केली आहे.




