विठ्ठल गड्डी यांची जनता दल (धर्मनिरपेक्ष) बेळगाव महानगर जिल्हाध्यक्षपदी निवड
जेडीएसचे राष्ट्रीय अध्यक्ष एच. डी. देवेगौडा यांच्यासह पक्षातील वरिष्ठ नेत्यांचे मानले आभार

बेलगाम प्राईड/ शहरातील ब्रह्मनगर येथील रहिवासी व सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल मारुती गड्डी (वय २९) यांची जनता दल (धर्मनिरपेक्ष) अर्थात जेडीएस पक्षाच्या बेळगाव महानगर जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल त्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसह पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले आहेत.
जेडीएसचे प्रदेशाध्यक्ष, माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान केंद्रीय पोलाद व अवजड उद्योगमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी त्यांच्या निवडीचा अधिकृत आदेश जारी केला आहे.
या निवडीबद्दल विठ्ठल गड्डी यांनी माजी पंतप्रधान व जेडीएसचे राष्ट्रीय अध्यक्ष एच. डी. देवेगौडा यांचे विशेष आभार मानले. पक्ष संघटनेच्या बळकटीकरणासाठी आशीर्वाद आणि मार्गदर्शन दिल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
तसेच राज्य कोअर कमिटीचे अध्यक्ष जे. के. कृष्णा रेड्डी, युवा जनता दलाचे अध्यक्ष निखिल कुमारस्वामी, जिल्हाध्यक्षपद मिळवून देण्यासाठी प्रयत्न व सहकार्य करणारे माजी आमदार वीरभद्रप्पा हळहरवी, वरिष्ठ उपाध्यक्ष प्रकाश सोनवाळकर, जिल्हाध्यक्ष शंकर माडलगी, प्रतापण्णा पाटील यांच्यासह पक्षातील सर्व ज्येष्ठ नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे त्यांनी आभार मानले.
पक्षाने सोपविलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडून बेळगाव महानगरात जेडीएस पक्षाची संघटना अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचा विश्वासही विठ्ठल गड्डी यांनी व्यक्त केला.




