Uncategorized
Trending

शिक्षणतज्ज्ञ चंद्रशेखर संबरगी यांचे निधन; मृत्यूनंतर देहदान करून जपली सामाजिक बांधिलकी

बेलगाम प्राईड/ खानापूर तालुक्यातील हिरेमुन्नवळ्ळी गावचे मूळ रहिवासी आणि सध्या बेळगाव येथील क्लब रोड परिसरात वास्तव्यास असलेले ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ चंद्रशेखर बसवण्णेप्पा संबरगी (वय ८४) यांचे सोमवारी निधन झाले.

चंद्रशेखर संबरगी हे पारिश्वाड येथील बी. व्ही. संबरगी संयुक्त पदवीपूर्व महाविद्यालयाचे अध्यक्ष होते. तसेच हिरेमुन्नवळ्ळी येथे यंदा होणाऱ्या ग्रामदेवता यात्रा महोत्सव समितीचे अध्यक्षपदही ते भूषवत होते. शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या योगदानामुळे त्यांची परिसरात विशेष ओळख होती.

संबरगी यांनी आपल्या मृत्यूनंतरही समाजासाठी योगदान देण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यांच्या अंतिम इच्छेनुसार बैलहोंगल येथील डॉ. रामण्णवर चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून त्यांचा देह बेळगाव येथील केएलई संस्थेच्या जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयाला दान करण्यात आला. मृत्यूनंतरही वैद्यकीय शिक्षण आणि संशोधनासाठी उपयोगी पडण्याच्या त्यांच्या या निर्णयातून त्यांनी समाजाप्रती असलेली बांधिलकी जपली. देहदानाच्या या निर्णयामुळे त्यांनी मृत्यूनंतरही समाजसेवेचा आदर्श घालून दिला आहे.

त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, तीन मुली, दोन भाऊ आणि एक बहीण असा परिवार आहे. चंद्रशेखर संबरगी यांच्या निधनाने शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या देहदानाच्या निर्णयाचेही सर्वत्र कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!