Uncategorized
Trending

मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरमध्ये १ व २ डिसेंबरला माजी सैनिकांसाठी डीएससी भरती मेळावा

बेलगाम प्राईड/ मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर, बेळगाव येथे १ आणि २ डिसेंबर २०२६ रोजी डिफेन्स सिक्युरिटी कॉर्प्स (डीएससी) मध्ये भरतीसाठी विशेष भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या भरती मेळाव्यात सैनिक जनरल ड्युटी (Soldier GD) आणि सैनिक क्लर्क (SD) या पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. ही भरती केवळ मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये सेवा बजावलेल्या भारतीय नियमित सैन्याच्या माजी सैनिकांसाठी तसेच मराठा लाईट इन्फंट्रीशी संबंधित टेरिटोरियल आर्मी (TA) कर्मचाऱ्यांसाठीच आयोजित करण्यात आली आहे.

भरतीसाठी आवश्यक पात्रता पुढीलप्रमाणे :

* सैनिक जनरल ड्युटी (GD) : यापूर्वीच्या सेवेतून निवृत्त झाल्याच्या तारखेपासून दोन वर्षांच्या आत पुनर्नियुक्तीसाठी अर्ज करणे आवश्यक आहे. भरतीच्या दिवशी वय ४६ वर्षांपेक्षा कमी असावे.

* सैनिक क्लर्क (SD) : यापूर्वीच्या सेवेतून निवृत्त झाल्याच्या तारखेपासून पाच वर्षांच्या आत पुनर्नियुक्तीसाठी अर्ज करणे आवश्यक आहे. भरतीच्या दिवशी वय ४८ वर्षांपेक्षा कमी असावे.

डीएससीमध्ये सैनिक जनरल ड्युटी आणि सैनिक क्लर्क (SD) या पदांवर भरती होण्यास इच्छुक व पात्र माजी सैनिकांनी १ डिसेंबर २०२६ रोजी सकाळी ८ वाजता मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर, बेळगाव येथे उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

भरतीसंदर्भातील अधिक माहिती आणि आवश्यक तपशीलांसाठी इच्छुक उमेदवारांनी मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर, बेळगाव येथे संपर्क साधावा, असे प्रसिद्धीपत्रकात कळविण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!