Uncategorized
Trending

हिंडलगा येथील सोमनाथनगरमध्ये कोजागिरी पौर्णिमा उत्साहात साजरी

बेलगाम प्राईड/ हिंडलगा सोमनाथनगर शिवराज कॉलनी येथील महिलांच्या वतीने रविवार दि. २५ रोजी रात्रौ कोजागरी पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. हा कार्यक्रम करण्यासाठी या भागातील महिलांनी पुढाकार घेतला होता. हा कार्यक्रम सोमनाथ लॉन या ठिकाणी करण्यात आला. उपस्थित महिलांचे स्वागत स्वाती कंग्राळकर यांनी केले.

हेमा पाटील, संगीता पलंगे, ज्योती साळुंखे, हेमा पावशे, कविता शिंदे, प्रेमा नाईक व इतर सर्व महिलांनी रात्रौ १२ वाजता लक्ष्मी प्रतिमेचे पूजन केले. तसेच समई पूजन करून सुवासिनी महिलांनी कुंकुम तिलक लावून गणेश आरती, कोजागिरी पौर्णिमेची गीते म्हटली.

याप्रसंगी अलायन्स क्लब ऑफ वेणुग्रामच्या अध्यक्षा सौ. राजेश्री पुरुषोत्तम हसबे यांनी कोजागिरी पौर्णिमेचे महत्त्व पटवून दिले. अश्विन शुद्ध पौर्णिमेला पूर्ण भरात आलेल्या चंद्राची पूजा करण्यात आली. यावेळी संगीता माऊथ, वर्षा सुळगेकर, प्रियांका गोजगेकर, विमल पावशे, आभार वंदना केसरकर यांनी मानले. सूत्रसंचालन राजश्री पाटील यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!