द.म.शिक्षण मंडळाच्या ज्योती सेंट्रल स्कूलचा ध्यानेश बामणेची कर्नाटक मिनी ऑलिंपिक स्पर्धेत निवड

बेलगाम प्राईड/ ज्योती सेंट्रल स्कूल नववि च्या ध्यानेश संदीप बामणे याची जिल्हा फुटबॉल संघात निवड होऊन लागलीच बंगलोर मध्ये होणाऱ्या कर्नाटक मिनी ऑलिंपिक स्पर्धेत 2026 14 वर्षा खालील गट साठी निवड झाली आहे.त्या साठी त्याचे नुकतेच बंगलोर ला प्रयाण झाले आहे.
ध्यानेश संदीप बामणे हा बेळगांव तालुक्यातील छोट्याश्या गोजगे खेड्यात राहणारा विद्यार्थी.वडील संदीप बामणे हे नवहिंद पतसंस्थेत शाखा प्रमुख तसेच केदार गुंडू बामणे सेवा निवृत्त मुख्याध्यापक (गोवा) यांचा नातू होय.
याने नुकत्याच झालेल्या 58 व्या फादर एडी फुटबॉल टूर्नामेंट 2026 मध्ये आपल्या संघाला सेमी फायनल तसेच फायनल सामन्यात एकाकी झुंज देत विजय मिळवून दिला.तसेच अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे फायनल ला जैन हेरिटेज संघा सोबत खेळताना दुसऱ्या टप्प्यात एका फ्री किक च्या जोरावर सामना जिंकून दिला त्या फ्री किक च्या त्या वायरल व्हिडिओ ने देशभरातील जवळ जवळ एका आठवड्यात 10 लाख म्हणजेच 1 मिलियन फुटबॉल चाहत्यांनी पहिला व 2 लाख लोकांनी लाइक सुधा केला.अशा त्याच्या या कामगिरी वर सध्या सोसियल मिडिया वर खूप चर्चा आहे.
आता उद्या पासून बंगलोर मध्ये मिनी ऑलिंपिक स्पर्धेत त्याला नक्कीच यश मिळेल अशी खूप फुटबॉल चाहत्यांच्या अपेक्षा व आशीर्वाद आहेत. त्याच्या या यशाला शाळेचे कोच मनोज जाधव, रेग फसी चे रेगो सर व वडील संदीप बामणे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.




