Uncategorized
Trending

धावत्या रेल्वेतून उतरण्याचा प्रयत्न जीवावर बेतला असता; आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे प्रवाशाचे प्राण वाचले

बेलगाम प्राईड/ धावत्या रेल्वेतून उतरण्याचा प्रयत्न करताना अचानक खाली पडलेल्या एका प्रवाशाला रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) जवानांनी प्रसंगावधान राखत सुरक्षितपणे वाचविले. बेळगाव रेल्वे स्थानकावर ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, बेळगाव रेल्वे स्थानकावर एका प्रवाशाने रेल्वे पूर्णपणे थांबण्यापूर्वीच धावत्या गाडीतून उतरण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याचा तोल गेला आणि तो अचानक रेल्वेच्या डब्यातून खाली पडला. ही घटना लक्षात येताच स्थानकावर तैनात असलेल्या रेल्वे सुरक्षा दलाचे उपनिरीक्षक संगमेश कलबुर्गी (आरपीएफ) जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

आरपीएफ जवानांनी प्रसंगावधान राखून संबंधित प्रवाशाला सुरक्षितपणे बाहेर काढत संभाव्य मोठा अपघात टाळला. जवानांच्या तत्परतेमुळे प्रवाशाचे प्राण वाचले. असाच प्रकार गेल्यावर्षीही घडली होती त्यावेळीही त्यावेळी त्या प्रवाशाला आरपीएफ कोप्पपद या पोलिसांनी बचावले होते.

दरम्यान, रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांनी घाईगडबड करू नये. रेल्वे पूर्णपणे थांबल्यानंतरच डब्यातून उतरावे किंवा गाडीत चढावे. धावत्या रेल्वेतून चढणे किंवा उतरणे अत्यंत धोकादायक असून, अशा निष्काळजीपणामुळे जीवघेणे अपघात होऊ शकतात, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे.आरपीएफ जवानांच्या सतर्कतेमुळे संभाव्य दुर्घटना टळल्याने त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!