
बेलगाम प्राईड/ ता.12 राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बेळगाव नगरचा विजयादशमी उत्सव रविवारी (12) साजरा करण्यात आला. यानिमित्त पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी पाच वाजता येथील सरदार्स मैदानापासून पथसंचनाला सुरुवात झाली. पथसंचलनात संघाचे हजारो स्वयंसेवक उपस्थित होते.
यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शताब्दी महोत्सव साजरा करण्यात येत आहे.
संंचालन दोन मार्गावरून काढण्यात आले. पहिला मार्ग सायंकाळी सरदार्स मैदानापासून कॉलेज रोड मार्गे गणपती मंदिर, राणी चन्नम्मा चौक, जिल्हाधिकारी कार्यालय आवारातून चव्हाट गल्ली, क्रांतिसिंह नाना पाटील चौक, भडकल गल्ली, खडक गल्ली कॉर्नर, कचेरी रोड, मदन मोहन मालवीय चौक, शनिवार खुट, गणपत गल्ली, नरगुंदकर भावे चौक, शनी मंदिर मार्ग, कुलकर्णी गल्ली मार्गे टिळक चौक

दुसऱ्या संचालनाचा मार्ग सरदार्स मैदान येथून लिंगराज देसाई चौक, कंग्राळ गल्ली, काकती वेस, स्वामी विवेकानंद मार्ग, रिसालदार गल्ली, गवळी गल्ली, गोंधळी गल्ली, स्वामी विवेकानंद चौक, समादेवी गल्ली, संयुक्त महाराष्ट्र चौक, खडेबाजार, हंस टॉकीज मार्ग, कडोलकर गल्ली, हुतात्मा चौक, मारुती गल्ली, मारुती मंदिर, बसवाण गल्ली येथून दोन्ही पथक टिळक चौक येथे एकत्रित आले तेथून संयुक्तरित्या रामलिंग खिंड गल्ली, धर्मवीर संभाजी महाराज चौक, कॉलेज रोड मार्गे लिंगराज कॉलेज मैदानावर पथसंचलनाची सांगता झाली.
यंदा संघ स्थापनेच्या शताब्दी महोत्सव निमित्त सुमारे महिनाभरापासून विविध ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. यामुळे सार्वजनिक सभा न घेता केवळ पथसंंचलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
पथसंचलन मार्गावर भगव्या ध्वजावर पुष्पवृष्टी करण्यात आली. आकर्षक रांगोळ्यांनी मार्ग सुशोभित करण्यात आला होता. विविध चौकात मोठ्या संख्येने नागरिक जमले होते. मार्गावर भगव्या पताका आणि ध्वज लावण्यात आले होते. त्यामुळे पथसंचलन मार्ग भगवामय झाला होता.पथसंचलनात खासदार जगदीश शेट्टर, आमदार अभय पाटील, माजी आमदार अनिल बेनके यांच्यासह भाजपचे नेते मंडळीनी भाग घेतला होता.




