Uncategorized
Trending

उद्योगपती शिरीष गोगटे यांच्या कडून उमेश कलघटगी यांच्या कार्याची प्रशंसा

बेलगाम प्राईड/ जलतरण या क्रीडा क्षेत्रामध्ये सातत्यपूर्ण योगदान, शिस्तबद्ध कार्यप्रणाली, आणि समाज हिताची निस्वार्थी भावना यासाठी ओळखले जाणारे मा. उमेश कलघटगी यांना कर्नाटक सरकार कडून प्रदान करण्यात आलेल्या “जीवन गौरव” पुरस्काराने त्यांच्या उल्लेखनीय कार्याचा सन्मानपूर्वक गौरव करण्यात आला.

ही बातमी सर्वत्र पसरल्या नंतर याची दखल घेत बेळगाव शहराचे नामांकित व सुप्रसिद्ध उद्योजक मा. श्री शिरीष गोगटे यांनी के,एल, ई संस्थेच्या सुवर्णा जे, एन, एम, सी (ऑलिंपिक साईझ ) जलतरण तलावामध्ये स्वईच्छा भेट देऊन त्यांच्या मुक्तहस्ते स्मृतिचिन्ह देऊन उमेश कलघटगी यांचा त्यांनी गौरव केला.

या प्रसंगी श्री.गोगटे यांनी आपल्या मनोगतात नमूद केले की, “खरे निस्वार्थ कार्य म्हणजे सातत्य , विनम्रता आणि उद्दिष्टपूर्ण योगदान आणि या सर्व गुणांचे उत्तम प्रतीक म्हणजे श्री उमेश कलघटगी. त्याच सोबत गोगटे यांनी व्यक्त केले की साधारणपने लोक आपल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून देवाकडे जाऊन स्वतःसाठी अर्जवे करतात. परंतु श्री उमेश कलघटगी हे असे व्यक्तिमत्व आहेत जे स्वतःसाठी नाही तर इतरांच्या कल्याणासाठी जगण्याची तत्वनिष्ठा परंपरा जपत आहेत.उमेश कलघटगी हे प्रतिकुलतेला संधीमध्ये परिवर्तित करणाऱ्या, संकटावर मात करण्याची अपूर्व क्षमता लाभलेल्या व्यक्तिमत्वाचे श्रेष्ठ उदाहरण मानले जाते असे त्यांनी सांगितले.

हा सन्मान त्यांच्या अविरत सेवेला मिळालेली अधिकृत दखल असून क्रीडा क्षेत्रातील त्यांच्या प्रभावी कार्याची ही उत्तम पोच पावती आहे. कल्याण,सेवा आणि समर्पण या तीन स्तंभावर उभे असलेले त्यांचे व्यक्तिमत्व आज अनेकांसाठी प्रेरणादायी आदर्श ठरले आहे.त्यांच्या कृतीनी अनेकांच्या आयुष्यात प्रकाश निर्माण केला. अशा त्यांच्या योगदानाला हा सन्मान योग्य तो मान देणारा ठरवतो.

या प्रसंगी शिरीष गोगटे यांनी उमेश कलघटगी यांचे हार्दिक अभिनंदन करून पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी सुधीर कुसाणे,नितीश कुडूचकर, अक्षय शेरेगार,अजिंक्य मेंडके, गोवर्धन काकतकर, इम्रान उचगावकर, शिवाजी मानमोडे सर्व जलतरण प्रशिक्षक व संपूर्ण पालकवर्ग तसेच सर्व जलतरण पटू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
error: Content is protected !!