Uncategorized
Trending

मराठा मंडळ शैक्षणिक संस्थेच्या संयुक्त विद्यमानाने शिवजयंती उत्साहात साजरी

बेलगाम प्राईड/ मराठा मंडळाच्या विविध शैक्षणिक संस्थांच्या संयुक्त विद्यमानाने सालाबाद प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज जयंती ढोल पथकाच्या तालावर आणि भगवामय वातावरणात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. हा कार्यक्रम बेळगाव येथील मराठा मंडळ मुख्यालयाच्या प्रांगणात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

संस्थेच्या अध्यक्षा डॉ. राजश्री नागराजू यांच्या मार्गदर्शन आणि प्रोत्साहनाने मोठ्या थाटात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.मराठा मंडळ पदवी महाविद्यालय, फार्मसी कॉलेज, मराठा मंडळ पॉलिटेक्निक कॉलेज, आणि मराठा मंडळ इंग्लिश मिडीयम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमानाने करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा मंडळ पदवी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. जे. मोळेराखी होते. तसेच मराठा मंडळ फार्मासी काँलेजचे प्राचार्य डॉ. विष्णू कंग्राळकर, मराठा मंडळ पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राचार्य डॉ. रवीकांत सूर्यवंशी आणि मराठा मंडळ इग्लिश मिडीयम स्कूलच्या मुख्याध्यापिका गायत्री सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाची सुरुवात मराठा मंडळ इंग्रजी माध्यम शाळेच्या पटांगणातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखी पूजनाने झाली. त्यानंतर ध्वज पूजा करून टाळ, भजन,ढोलताशा, लेझीम, लाठीचे विविध खेळ, फुगड्या खेळत छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात सर्वांचे आगमन झाले. यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण, पाळनाविधी करून करण्यात आली. यानंतर विद्यार्थ्यांनी शिवगीत, लेझीम, पोवाडा,ढोलताशा,ध्वजनृत्य आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली.यावेळी विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधाण केली होती. भगवा ध्वज फडकवत विद्यार्थ्यांनी महाराजांच्या पराक्रमाची आठवण करून दिली. या उत्सवामुळे महाविद्यालयीन परिसरात देशभक्तीचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले होते.

प्राचार्यांनी आपल्या भाषणातून शिवाजी महाराजांच्या शौर्य, दूरदृष्टी आणि स्वराज्य स्थापनेच्या कार्याचा उल्लेख करत विद्यार्थ्यांना त्यांच्या आदर्शांचे पालन करण्याचे, व्यसनमुक्त राहण्याचे आवाहन केले. महाराजांचे शौर्य, पराक्रम आणि देशभक्तीचे महत्त्व अधोरेखित केले. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात पार पडला. सर्व शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!