Uncategorized
Trending

न्यायाधीश प्रियांका राजगोळकर यांचा सत्कार बेळगाव वकिलांच्या वतीने सन्मान

बेलगाम प्राईड/ शाहूनगर, बेळगाव येथील रहिवासी प्रियांका राजगोळकर यांची दिवाणी न्यायाधीश पदी निवड झाल्याबद्दल शाहूनगरवासियांतर्फे अभिनंदन करून त्यांचा सत्कार करण्यात आला.

शाहूनगर येथील रहिवासी प्रियांका राजगोळकर -बेकवाडकर यांनी दिवाणी न्यायाधीश परिक्षा उत्तम श्रेणीमध्ये उत्तीर्ण होऊन न्यायाधीशपदाला गवसणी घातली आहे. या पद्धतीने न्यायाधीश पदी निवड झाल्याबद्दल प्रियांका त्यांच्या घरी जाऊन ॲड. मोहन नंदी व ॲड. मारुती कामान्नाचे यांनी अभिनंदन करून भावी वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.

तसेच दिवाणी न्यायाधीश बनलेल्या प्रियांका यांचा शाहूनगर येथील रहिवाशांच्यावतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन खास सत्कार केला. सत्काराबद्दल प्रियांका राजगोळकर -बेकवाडकर यांनी सर्वांचे आभार मानले. याप्रसंगी विजय सांबरेकर, क्षितिज सांबरेकर आदींसह स्थानिक रहिवाशी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!