Uncategorized
Trending

बेळगाव येथे डीएससी भरती मेळावा ११-१२ मे रोजी

बेलगाम प्राईड/ येथील मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरमध्ये ११ व १२ मे २०२६ रोजी डीएससी (डिफेन्स सिक्युरीटी कार्पोरेशन) अंतर्गत एनसीओ भरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा माजी सैनिकांसाठी असून ‘सोल्जर जनरल ड्युटी’ व ‘सोल्जर क्लर्क’ (एसडी) या पदांसाठी भरती होणार आहे.

या भरतीसाठी अर्ज करणारे उमेदवार मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंटमध्ये सेवा केलेले असणे आवश्यक आहे. उमेदवाराचा सेवाकालातील चारित्र्य ‘एक्सेम्प्लरी’ किंवा ‘व्हेरी गुड’ असणे गरजेचे आहे. तसेच शिस्तभंगाची गंभीर नोंद नसावी. उमेदवाराने किमान पाच वर्षांची सेवा पूर्ण केलेली असावी. पुनर्नियुक्तीची मुदत सोल्जर जीडीसाठी दोन वर्षे व सोल्जर क्लर्कसाठी पाच वर्षांच्या आत असावी.

वैद्यकीयदृष्ट्या ‘शार्प-१’ श्रेणी आवश्यक असून उमेदवाराने सेवामुक्ती नियमांनुसार पूर्ण केलेली असावी. शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण किंवा नॉन-मॅट्रिकसाठी एसीई-III असावी. वयोमर्यादा सोल्जर जीडीसाठी ४६ वर्षांखाली व सोल्जर क्लर्कसाठी ४८ वर्षांखाली ठेवण्यात आली आहे.

भरतीसाठी उमेदवारांनी डिस्चार्ज बुक, शैक्षणिक प्रमाणपत्रे, जात प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, चारित्र्य प्रमाणपत्र, कुटुंबाचा फोटो, आर्मी ग्रुप इन्शुरन्स प्रमाणपत्र, पीपीओ, तसेच इतर आवश्यक कागदपत्रे सादर करावीत. याशिवाय १५ पासपोर्ट फोटो व सर्व कागदपत्रांच्या प्रती आवश्यक आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!