Uncategorized
Trending

महावीर जन्मकल्याणक महोत्सवात डॉ. कोरे यांचा सन्मान सोहळा

बेलगाम प्राईड/ भगवान महावीर यांच्या जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त महावीर भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात पद्मश्री प्रभाकर कोरे यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला पंजाबचे राज्यपाल गुलाबचंद कटारिया हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

यावेळी बोलताना राज्यपाल कटारिया यांनी भगवान महावीरांनी दिलेल्या सत्य, अहिंसा आणि अपरिग्रह या तत्त्वांचे महत्त्व अधोरेखित केले. “या तत्त्वांचे आचरण केल्यास समाजात शांतता व सौहार्द नांदू शकते,” असे ते म्हणाले.

सन्मान स्वीकारल्यानंतर डॉ. प्रभाकर कोरे यांनी जैन समाजाकडून मिळालेल्या आदर व सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.कार्यक्रमाची सुरुवात ज्येष्ठ वकील रविराज पाटील यांच्या स्वागतपर भाषणाने झाली. आमदार अभय पाटील यांनी प्रास्ताविक करत डॉ. कोरे यांची ओळख करून दिली, तर राजेंद्र कटारिया जैन यांनी राज्यपालांची ओळख करून दिली.

याच प्रसंगी राज्यपालांच्या पत्नी अनिता कटारिया यांचा वाढदिवसानिमित्त विशेष सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाला सुनील हनमन्नवर, ललित संघवी कटारिया, नरेंद्र जैन, संतोष जैन, प्रवीण बाफना, विनोद दोड्डणवर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचा समारोप माजी आमदार संजय पाटील यांच्या आभार प्रदर्शनाने झाला, तर अंकिता खोडा यांनी सूत्रसंचालन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!