Uncategorized
उचगावच्या सुकन्येने कॉमर्समध्ये मिळवले 99 टक्के गुण

उचगावच्या सुकन्येने कॉमर्समध्ये मिळवले 99 टक्के गुण
बेलगाम प्राईड/ पीयूसी द्वितीय वर्ष परीक्षेचा निकाल गुरुवारी दुपारी जाहीर करण्यात आला. यामध्ये बेळगाव उचगाव मधील विद्यार्थ्यांनी लक्षणीय यश मिळवले आहे. बेळगाव येथील अंगडी कॉलेजची विद्यार्थिनी कुमारी साहिबा खाजामिया सनदी हिने कॉमर्स विभागात 99 टक्के गुण मिळवून लक्षणीय यश संपादन केले आहे. उचगाव सारख्या ग्रामीण भागातील रहिवासी असलेल्या साहिबा हिने यापूर्वी देखील आपली चमकदार कामगिरी केली होती. आता बारावी सारख्या महत्त्वपूर्ण परीक्षेत तिने हे यश मिळवले. तिला सहाशे पैकी 595 (99.16) गुण मिळाले आहेत. याबद्दल तिच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.




