शिवजयंती मिरवणुकीत डॉल्बी वापरावर बंदी
आकर्षक देखावे आणि मर्दानी खेळ सादर करणाऱ्या मंडळांना मिरवणुकीत सहभाग

बेलगाम प्राईड/ बेळगावची ऐतिहासिक शिवजयंती मिरवणूक शिस्तबद्ध आणि पारंपारिक पद्धतीने साजरी करण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी सर्व मंडळांच्या बैठकीत डॉल्बी बंदी आणि सुरक्षा नियमावलीबाबत कडक निर्देश दिले आहेत.
शिवजयंती निमित्त पोलीस आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत शिवजन्मोत्सव ते राज्याभिषेक दिनापर्यंत विविध कार्यक्रम राबवण्यावर चर्चा करण्यात आली. पोलीस प्रशासनाने घातलेल्या अटी मान्य करून कोणताही गोंधळ न करता यंदाची शिवजयंती साजरी करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आले असल्याचे सांगितले.

शिवजयंती चित्ररथ महामंडळाचे अध्यक्ष सुनील जाधव यांनी मिरवणुकीदरम्यान पोलीस, हॅस्कॉम, अग्निशमन दल, जिल्हा प्रशासन आणि रुग्णवाहिका सेवांचा समावेश असलेला एकच ‘मदत कक्ष’ स्थापन करण्याची मागणी केली. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास शिवभक्तांना एकाच ठिकाणी सर्व मदत उपलब्ध व्हावी, ही मागणी प्रशासनाने तात्काळ मान्य केली आहे.
शिवजयंती निमित्त पोलीस आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत शिवजन्मोत्सव ते राज्याभिषेक दिनापर्यंत विविध कार्यक्रम राबवण्यावर चर्चा करण्यात आली. पोलीस प्रशासनाने घातलेल्या अटी मान्य करून कोणताही गोंधळ न करता यंदाची शिवजयंती साजरी करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आल्याचे सुनील जाधव यांनी सांगितले. शिवजयंती चित्ररथ महामंडळाचे अध्यक्ष सुनील जाधव यांनी मिरवणुकीदरम्यान पोलीस, हॅस्कॉम, अग्निशमन दल, जिल्हा प्रशासन आणि रुग्णवाहिका सेवांचा समावेश असलेला एकच ‘मदत कक्ष’ स्थापन करण्याची मागणी केली. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास शिवभक्तांना एकाच ठिकाणी सर्व मदत उपलब्ध व्हावी, ही मागणी प्रशासनाने तात्काळ मान्य केली आहे.

मिरवणुकीत ऐतिहासिक देखाव्यांना प्राधान्य दिले जाईल आणि डीजे लावून हिडीस नृत्य करणाऱ्या तसेच इतर मंडळांच्या सादरीकरणात अडथळा आणणाऱ्या मंडळांना मुख्य मिरवणुकीत प्रवेश दिला जाणार नाही. अशा मंडळांच्या चित्ररथांना मिरवणुकीच्या सर्वात शेवटी पाठवले जाईल आणि मर्यादेबाहेर आवाज असणारी डॉल्बी सिस्टीम जप्त केली जाईल. देखाव्यांचे सादरीकरण करताना कोणत्याही जाती-धर्माच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत, याची दक्षता मंडळांनी घ्यावी, असे भूषण बोरसे यांनी स्पष्ट केले.
बेळगावच्या शिवजयंती मिरवणुकीला एक वेगळे ऐतिहासिक महत्त्व असून हा सुंदर सोहळा पार पाडण्यासाठी कलाकार आणि कार्यकर्ते महिनाभर परिश्रम घेतात, त्यामुळे या उपक्रमाला गालबोट लागेल असे कोणतेही कृत्य करू नये. मंडळांनी आपले सादरीकरण मुख्य ठिकाणी करावे आणि जिथे गर्दीचे व्यवस्थापन करणे कठीण होईल अशा ठिकाणी देखावे सादर करणे टाळावे.

मिरवणूक वेळेत सुरू करून वेळेत संपवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. अनेकदा काही चित्ररथ नेमून दिलेल्या मार्गावरून न येता मधोमध येतात, त्यामुळे इतर मंडळांना अडचण निर्माण होते. पोलिसांसमोरही आव्हान उभे राहते.मिरवणूक लांबल्यास दुसऱ्या दिवशी मिरवणूक मार्गावरील व्यावसायिकांना त्रास होतो, त्यामुळे सर्वांनी सहकार्य करावे. तसेच बंदोबस्तासाठी परगावाहून आलेल्या पोलीस कुमकचा आदर राखावा, अशी प्रतिक्रिया नारायण बरमणी यांनी व्यक्त केली.
शिवजयंती उत्सव कोणत्याही राजकीय किंवा सामाजिक वादात न पडता केवळ शिवरायांच्या आदरार्थ एकजुटीने साजरा करण्याचा निर्धार रमाकांत कोंडुस्कर यांनी व्यक्त केला. तसेच मिरवणुकीतील शिस्त आणि सहकार्य यावर रणजीत चव्हाण पाटील यांनी जोर दिला. यावेळी विविध मान्यवरांनी आपल्या सूचना मांडल्या असून लाखो लोकांच्या उपस्थितीत होणारा हा सोहळा शांततेत पार पाडण्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.
मिरवणूक कोणतीही बाधा न येता शांततेत पार पाडण्यासाठी शिवभक्तांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या बैठकीला शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे, उपायुक्त नारायण बरमणी, मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष अंकुश केसरकर, रमाकांत कोंडुस्कर, रणजीत चव्हाण पाटील, प्रकाश मरगाळे मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाचे पदाधिकारी, सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




