Uncategorized
Trending

गिरीश होसूर यांची केंद्र सरकारमध्ये संयुक्त सचिवपदी नियुक्ती 

बेलगाम प्राईड/ खानापूर तालुक्यातील मूळचे बिडी गावचे रहिवासी आणि १९९६ बॅचचे भारतीय वन सेवा (IFS) अधिकारी गिरीश होसूर यांची केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयात संयुक्त सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

गिरीश होसूर यांनी आपल्या कारकिर्दीत राज्य आणि केंद्र स्तरावर विविध महत्त्वाच्या पदांवर कार्य करत उल्लेखनीय योगदान दिले आहे. बेळगाव येथे उपवनसंरक्षक (Deputy Conservator of Forests) म्हणून काम करताना त्यांनी वन प्रशासनात मोलाची भूमिका बजावली होती.

कर्नाटकमध्ये त्यांनी मुख्यमंत्री सचिवालयात सचिव म्हणून तसेच बेंगळुरू महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (BMRDA) चे आयुक्त म्हणून काम पाहिले आहे. या काळात त्यांनी नियोजन व विकासाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये सहभाग घेतला.

केंद्रस्तरावरही त्यांनी मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या (HRD) उच्च शिक्षण विभागात संयुक्त सचिव म्हणून जबाबदारी सांभाळली होती. त्यामुळे प्रशासन आणि धोरण अंमलबजावणीचा त्यांना मोठा अनुभव आहे.

त्यांच्या या नव्या नियुक्तीमुळे सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण क्षेत्रातील धोरणांची प्रभावी अंमलबजावणी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!