
बेलगाम प्राईड/ भुतान येथे भरविलेल्या दक्षिण आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेत बेळगावच्या तीन शरीरसौष्ठवपटूंनी उल्लेखनीय कामगिरी करीत बेळगावचे नाव आशिया खंडात उज्ज्वल केल्याबद्दल मराठा बँकेतर्फे त्यांचा खास सत्कार करण्यात आला.
६८ किलो वजनी गटात प्रताप कालकुंद्रीकरने सुवर्णपदक, ८५ किलो वजनी गटात प्रशांत खन्नूकरने रौप्यपदक, महिला फिजिक्स स्पोर्ट्समध्ये केतकी पाटीलने रौप्यपदक मिळविले. या कामगिरीची दखल घेऊन मराठा बँकेच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
अध्यक्षस्थानी बँकेचे चेअरमन बाळाराम पाटील होते. प्रारंभी जनरल मॅनेजर संतोष धामणेकर यांनी प्रास्ताविक केले. यानंतर बँकेचे बीओएम चेअरमन बाळासाहेब काकतकर यांनी परिचय करून देताना बेळगावमध्ये शरीरसौष्ठवपटू निर्माण करण्याकरिता मराठा युवक संघ व मराठा बँक यांच्या योगदानाबद्दल माहिती दिली.
यानंतर चेअरमन बाळाराम पाटील, व्हा. चेअरमन शेखर हंडे, संचालिका रेणू किल्लेकर व दिपाली दळवी यांच्या हस्ते मान्यवरांचा शाल, पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी संचालक दिगंबर पवार, रेणू किल्लेकर यांनी बँकेच्यावतीने शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाला बँकेचे संचालक एल. एस. होनगेकर, विनोद हंगिरकर, मोहन चौगुले, लक्ष्मण नाईक, मोहन बेळगुंदकर, विनायक होनगेकर, विश्वजित हसबे, प्रशांत चिगरे, अशोक कांबळे आदी उपस्थित होते. अजित सिद्दण्णावर, एम. गंगाधर, सेक्रेटरी हेमंत हावळ, सुनील राऊत, अनंत लंगरकांडे, सुनील पवार, किर्तेश कावळे, आकाश हुलीयार, राजू नलवडे, प्रशांत सुगंधी, मारुती देवगेकर, सुहास किल्लेकर व बँक कर्मचारी उपस्थित होते. शेखर हंडे यांनी आभार मानले.




