Uncategorized
Trending

बेळगावात डॉ.बाबू जगजीवन राम यांची ११९ वी जयंती साजरी 

जगजीवन राम, देशाचे एक अद्वितीय नेते: डॉ. संजीव के. तलवार

बेलगाम प्राईड/ इतिहास महान व्यक्तींची नोंद करतो, पण काळ त्यापैकी फक्त काहींनाच लक्षात ठेवतो. डॉ. बाबू जगजीवन राम हे त्यापैकीच एक आहेत, असे संजीव के. तलवार यांनी बोलताना सांगितले.

जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि समाजकल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (०५ एप्रिल) संगमेश्वर नगर येथील डॉ. बाबू जगजीवन राम पार्कमध्ये आयोजित ‘हरित क्रांतीचे प्रणेते डॉ. बाबू जगजीवन राम जयंती; महोत्सव-२०२६’ या कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले, समानता हा समाजाचा पाया आहे आणि कामगारांचे कल्याण हेच देशाचे कल्याण आहे. अन्नसुरक्षा हीच देशाची सुरक्षा आहे,बाबू जगजीवन राम यांनी तरुण वयातच जातीय व्यवस्थेला विरोध केला आणि समाजातील अन्यायकारक व्यवस्था दूर करण्यासाठी ते उपपंतप्रधान झाले.

संविधानाची योग्य अंमलबजावणी झाली पाहिजे आणि परिस्थितीपुढे हार न मानता त्या वेळेला संधी बनवा, असे सांगणाऱ्या डॉ. बाबू जगजीवन राम यांचे जीवन आणि आदर्श समजून घ्या असे आवाहन त्यांनी केले.

पोलीस आयुक्त भूषण गुलबराव बोरासे म्हणाले, “जगजीवन राम सर्व तरुणांसाठी प्रेरणास्थान बनोत. आपण सर्वांनी समानता आणि समतेच्या भावनेने जगले पाहिजे.”

जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन म्हणाले की, जगजीवन राम हे देशाने पाहिलेल्या सर्वात उत्कृष्ट नेत्यांपैकी एक होते. त्यांनी कामगारांसाठी अनेक कायदेही लागू केले असेही त्यांनी सांगितले.

बेळगाव उपविभागीय अधिकारी श्रवण नायक म्हणाले की, शासन म्हणजे सत्ता मिळवणे नव्हे, तर त्यातून किती लोकांना फायदा झाला आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे; जगजीवन राम यांचे जीवन हा समाजव्यवस्थेचा पाया असून त्यांचे विचार आपण आपल्या जीवनात अंगीकारले पाहिजेत.

कार्यक्रमाला समाजकल्याण विभागाचे सहसंचालक रामनगरा गौडा कन्नोल्ली, समाजकल्याण विभागाचे सहायक संचालक परशुराम वग्गन, कर्नाटक कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष बसवराज चन्नय्या, क्रीडा विभागाचे उपसंचालक रायप्पागोळ, चर्मकार समाजाचे नेते भीमराव पवार,मल्लेश चोगुले, महादेव चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. सिद्राय मेत्री, लक्ष्मण लगमप्पागोळ, बसवराज अरवल्ली, महादेव पोळ, बसवराज रायवगोळ, सुधीर चौगले, संदीप कोलाकारा, हिरालाल चव्हाण जीवन कुरणे यांच्यासह विविध जाती धर्मातील लोक कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!