हंदिगनूर लक्ष्मी यात्रा 14 एप्रिल पासून यात्रेसाठी ग्रामस्थांची लगबग
रथ जोडणीच्या कामात ग्रामस्थ मग्न काम अंतिम टप्यात,

बेलगाम प्राईड/ हंदिगनूरसह परिसरातील आठ गावांची ग्रामदेवता असणाऱ्या लक्ष्मीदेवीची यात्रा ५८ वर्षांनी भरणार आहे. 14 एप्रिल पासून या यात्रेला प्रारंभ होणार आहे या पार्श्वभूमीवर यात्रा उत्सव कमिटीतर्फे कामाना वेग आला आहे.
https://www.facebook.com/share/v/18T33rnA2N/
यात्रोत्सवामध्ये हंदिगनूर, म्हाळेनहट्टी, बोडकेनट्टी, कुरीहाळ कट्टणभावी, होसोळी गावांचा समावेश आहे. रथ जोडणी बरोबर रंगरंगोटीचे कामे अंतिम टप्प्यात आले आहे. त्याबरोबर गावात रस्ते गटारी आणि इतर विकास कामे हाती घेण्यात आली आहेत. एकूणच यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी कमिटीची धडपड सुरू आहे.

लक्ष्मी यात्रोत्सव कमिटीचे अध्यक्ष गंगाधर पाटील, कल्लाप्पा कडोलकर, भैरवनाथ पाटील, दयानंद पाटील, मारुती पाटील, पुंडलिक पाटील, महेश पाटील, आनंद पाटील, किरण पाटील, बाबू तळवार, विजय कांबळे आदीसह ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत.




