Uncategorized
Trending

शिवजयंती महामंडळाच्या अध्यक्ष निवडीला आक्षेप शुभम शेळकेचा राजीनामा 

बेलगाम प्राईड/ बेळगावातील शिवजयंती उत्सवाचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्या निधनानंतर हे पद रिक्त होते.106 वर्षाची परंपरा असणाऱ्या बेळगावच्या शिवजयंती उत्सवाचे परंपरा ही मोठी आहे. त्यामुळे या शिवजयंती महोत्सवाला खूप महत्व आहे. गोवा, महाराष्ट्र व सीमा भागातून मोठ्या प्रमाणात या शिवजयंती उत्सवाचा सोहळा पाहण्यासाठी शिवभक्त मोठ्या प्रमाणात बेळगावात गर्दी करतात.

अशा या महत्त्वपुर्ण शिवजयंती उत्सवाचे अध्यक्षपद मनमानी पद्धतीने कुणालाही विश्वासात न घेता खिल्लत वाटल्या सारखी आपल्या मर्जीतील माणसाला दिल्याने नाराज झालेल्या शुभम शेळके यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

अध्यक्ष पदासाठी अनेक वर्षे कार्ये केलेल्या शिवभक्तांची निवड होणे अपेक्षित होते. पण नेहमीच मनमानी कारभाराने मराठी माणसात नाराजी पसरवणाऱ्या नेतृत्वाच्या कार्य शैलीवर आक्षेप घेत शेळके यांनी आपला राजीनामा दिला आहे.

एकंदर या अध्यक्ष निवडीच्या बैठकीतच कार्यकर्त्यात नाराजी पसरली होती त्याची परिणीती म्हणजे शुभम शेळके यांचा राजीनामा दिला आहे.काही मोजक्याच लोकांच्या कानभरणी वरून ही निवड झाली आहे. ती व्यक्तिशा मला मान्य नाही म्हणून मी या उपलब्ध पदाचा राजीनामा देत आहे. असे शेळके यांनी दिलेल्या राजीनाम्यात म्हटले आहे.

या बैठकीत अध्यक्ष पदाचा विषय पटलावर नसताना अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांची निवड झाली आहे. असा आक्षेप घेत तडकाफडकी झालेली निवड ही शिवजयंतीच्या परंपरेला न शोभणारी आहे. असा देखील ठपका त्यांनी ठेवला आहे.

शंभरहून अधिक वर्षाची परंपरा असलेल्या पारंपरिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची निवड तडका फडकी घेणे हे परंपरेला शोभणारे नसून या निवडीला माझा वैयक्तिक आक्षेप आहे. ही निवड योग्य नाही. गेल्या 40 वर्षात युवक मंडळातून कार्यरत कार्यकर्ते आणि जेष्ठ व्यक्ती आहेत त्या सर्वांना विश्वासात घेऊन निवड होणे अपेक्षित होते. मात्र तसे झाले नाही असाही त्यांनी उल्लेख राजीनाम्यात घेतला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!