Uncategorized
Trending

यात्रा कमिटीच्या वतीने नागरी सुविधांसाठी मनपा आयुक्त व लोकप्रतिनिधींना निवेदन

बेलगाम प्राईड /एप्रिलच्या 27 तारखेपासून बी.के कंग्राळी येथे लक्ष्मी यात्रा होणार असून या यात्रेच्या पूर्वतयारीसाठी लक्ष्मी यात्रेच्या कमिटीच्या वतीने आज सकाळी मनपा महानगरपालिकेचे आयुक्त महापौर उपमहापौर उत्तरचे आमदार असिफ सेठ असे सर्वांना प्रत्यक्षरित्या भेटून नागरी समस्या पूर्तता करून देण्यासाठी निवेदन सादर करण्यात आले.

बी.के कंग्राळी भागात होत असलेल्या यात्रेचा काही भाग महानगरपालिकेच्या हद्दीत येत असून तो भाग महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छता करून त्या ठिकाणी पाण्याची सुविधा रस्त्याची रिपेरी कचरा साठत असलेला भाग स्वच्छता करणे अशा विविध नागरी व्यवस्था संदर्भात स्वच्छता करण्यासाठी भेटून महानगरपालिकेच्या आयुक्त महापौर उपमहापौर उत्तर विभागाचे आमदार असिफ शेठ अशा सर्वांना निवेदन सादर करण्यात आले त्यांच्याशी चर्चा करून सहकार करण्यासाठी सांगण्यात आले.

यावेळी यात्रा कमिटीचे अध्यक्ष जयराम पाटील सेक्रेटरी शंकर पुणेरी सदस्य विजय पावशे प्रशांत पवार राजू मंडळ कर ओंकार पाटील मल्लाप्पा तलवार दीपक सुतार व इतर ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी यात्रेपूर्वी आम्ही त्या सर्व नागरी सुविधा करून देऊ असे त्यांनी आश्वासन दिले. तुम्ही सांगितलेल्या समस्ये बरोबरच फिरते स्वच्छतागृह तिथे ठेवण्याचीही व्यवस्था करून देण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!