Uncategorized
Trending

ईडी कारवाई अंतर्गत,१३.३ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त

ईडी कारवाई अंतर्गत,१३.३ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त

बेलगाम प्राईड / बेळगाव अबकारी विभागाचे अतिरिक्त आयुक्त वाय. मंजुनाथ यांच्या निवासस्थानी ईडीने टाकलेल्या छाप्यात महत्त्वाची माहिती समोर आली आहे.छाप्याची कारवाई नंतर प्रसारमाध्यमांना माहिती देताना ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की,या चौकशी मोहिमेदरम्यान एकूण १३.३ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या छाप्यात ५.५ कोटी रुपये रोख, ७.८ कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने आणि ३.३ लाख रुपयांचे विदेशी चलन सापडले. याशिवाय, ईडीने कॅश बुक आणि मालमत्तेच्या नोंदींसह अनेक महत्त्वाची आर्थिक कागदपत्रे जप्त केली. जप्त केलेल्या कागदपत्रांच्या आधारे तपास अधिक तीव्र करण्यात आला असून या प्रकरणात नवीन वळण येण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!