महाराष्ट्र एकीकरण युवा समिती शैक्षणिक उपक्रम २०२६
इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांची पटसंख्या पाठविण्याचे आवाहन

बेलगाम प्राईड/ सालाबाद प्रमाणे मातृभाषेतील शाळेत प्रवेश घेऊन मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने सीमाभागातील सर्व शाळांमध्ये शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे.
मागील ९ वर्षे हा उपक्रम सलग सुरू असून २०२६ शैक्षणिक वर्षात सीमाभागातील सर्व मराठी प्राथमिक शाळांमध्ये प्रवेश घेतलेल्या *१लीच्या विद्यार्थ्यांची पटसंख्या मागवीत आहोत* तरी शाळा मुख्याध्यापक–शिक्षक, पालक, आजी माजी विद्यार्थी किंवा सदर गावातील युवा समितीच्या कार्यकर्त्यांनी इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांची पटसंख्येची यादी लवकरात लवकर युवा समितीच्या पदाधिकाऱ्याकडे वॉट्सअप द्वारे किंवा प्रत्यक्ष खालील नमूद पत्त्यावर सुपूर्द करावी.
कार्यालयीन पत्ता
महाराष्ट्र एकीकरण युवा समिती कार्यालय कावळे संकुल, आर.पी.डी. दुसरा क्रॉस,टिळकवाडी बेळगाव
संपर्क : अंकुश केसरकर(अध्यक्ष) 9739963229, श्रीकांत कदम(सरचिटणीस) 9611756529, प्रतिक पाटील 7338145673,आशिष कोचेरी 9886103373, निखिल देसाई 9902808280, आकाश भेकणे 7204651586 सहकार्य समाजाचे कर्तव्य युवा समितीचे




