मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरमध्ये डीएससी भरती रॅली
माजी सैनिकांसाठी पुन्हा सैन्य सेवेत दाखल होण्याची सुवर्णसंधी

July 6, 2026
बेलगाम प्राईड/ मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर बेळगाव येथे ३ व ४ ऑगस्ट २०२६ रोजी डिफेन्स सिक्युरिटी कॉर्म्स (DSC) भरती रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या भरतीद्वारे मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटमधील नियमित सैन्य आणि टेरिटोरियल आर्मी (TA) मधील पात्र माजी सैनिकांची सोल्जर जनरल ड्युटी (GD) आणि सोल्जर क्लर्क (SD) पदांसाठी निवड केली जाणार आहे.
मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरने प्रसिद्ध केलेल्या माहिती पत्रकानुसार, ही भरती केवळ मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटमध्ये सेवा बजावलेल्या माजी सैनिकांसाठी असून उमेदवारांनी विहित अटी व पात्रता पूर्ण करणे आवश्यक आहे.
भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची सेवामुक्तीच्या वेळी ‘Exemplary’ किंवा ‘Very Good’ अशी चारित्र्य नोंद असणे अनिवार्य आहे. तसेच शिस्तभंगाच्या गंभीर कारवाया, रेड इंक नोंदी किंवा लष्करी कायद्यांतर्गत शिक्षा नसाव्यात. गेल्या तीन वर्षांत कोणतीही रेड इंक नोंद नसणे आवश्यक आहे.
उमेदवारांनी यापूर्वी किमान पाच वर्षांची कलर सर्व्हिस पूर्ण केलेली असावी. सोल्जर जनरल ड्युटी पदासाठी सेवानिवृत्तीनंतर दोन वर्षांच्या, तर सोल्जर क्लर्क (SD) पदासाठी पाच वर्षांच्या आत पुनर्नियुक्तीसाठी अर्ज करता येणार आहे.
वैद्यकीयदृष्ट्या उमेदवार श्रेणीत असणे आवश्यक आहे. सेवामुक्ती नियमित सेवा पूर्ण झाल्यानंतर किंवा स्वतःच्या विनंतीवर झालेली असावी. शैक्षणिक पात्रतेमध्ये मॅट्रिक किंवा त्यावरील शिक्षण, तर बिगर मॅट्रिक उमेदवारांसाठी ACE-III पात्रता ग्राह्य धरण्यात येणार आहे.
वयोमर्यादा
सोल्जर जनरल ड्युटी (GD) : कमाल ४६ वर्षे, सोल्जर क्लर्क (SD) : कमाल ४८ वर्षे आवश्यक कागदपत्रे भरतीसाठी येताना उमेदवारांनी खालील मूळ कागदपत्रे सोबत आणणे बंधनकारक आहे.
डिस्चार्ज बुक, सर्व शैक्षणिक प्रमाणपत्रे, जात प्रमाणपत्र, अधिवास/जन्मस्थान प्रमाणपत्र ग्रामपंचायत सरपंच व पोलीस पाटील यांच्या स्वाक्षरीसह चारित्र्य प्रमाणपत्र कुटुंबातील सदस्यांचा तपशील असलेला प्रमाणित कौटुंबिक फोटो आर्मी ग्रुप इन्शुरन्स प्रमाणपत्र सर्व कागदपत्रांच्या दोन संचांमध्ये साक्षांकित प्रती १५ पासपोर्ट आकाराचे अलीकडील रंगीत फोटो
जिल्हा पोलीस अधीक्षकांनी जारी केलेले व्हेरिफिकेशन प्रमाणपत्र PPO टेरिटोरियल आर्मी उमेदवारांसाठी आवश्यक सेवा व ATC प्रमाणपत्रे
शारीरिक चाचणीसाठी विशेष सूचना
भरतीदरम्यान कंबाइंड फिजिकल टेस्ट (CPT) घेण्यात येणार असल्याने सर्व माजी सैनिकांनी कॉम्बॅट ड्रेस आणि DMS बूट्स सोबत आणावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
सकाळी ८ वाजता हजर राहण्याचे आवाहन सर्व पात्र उमेदवारांनी ३ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ८.०० वाजता मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर, बेळगाव येथे सर्व मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहावे. भरतीसंदर्भातील अधिक माहितीसाठी इच्छुक माजी सैनिकांनी मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर, बेळगाव येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.




