Uncategorized
Trending

सर संचालक मोहन भागवत दौऱ्यावेळी “नो फ्लाय झोन” ची घोषणा 

बेलगाम प्राईड/ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंचालक मोहन भागवत यांच्या बेळगाव दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने त्यांचे वास्तव्य व कार्यक्रमाच्या ठिकाणापासून दोन किलोमीटर अंतरापर्यंत नो फ्लाय झोन घोषित केला आहे. या परिसरात ड्रोन प्याराग्लाइडर्स मानवरहित हवाई उपकरणे उडविण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी शनिवारी सायंकाळी यासंबंधीचा आदेश जारी केला आहे. सोमवार दिनांक 6 ते मंगळवार दिनांक 14 जुलैपर्यंत सरसंचालकांचे बेळगावात वास्तव्य असणार आहे. फॉन्ड्री क्लस्टर गेस्ट हाऊस अनगोळ औद्योगिक वसाहत उद्यम बाग, संत मीरा हायस्कूल सह्याद्री कॉलनी भाग्यनगर एक्सटेन्शन अनगोळ, जगन्नाथराव जोशी स्मारक भवन गुडशेठ रोड शास्त्रीनगर, खडेबाजार आदी ठिकाणी ते कार्यक्रमात भाग घेणार आहेत.

सरसंचालकांच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर वास्तव्य कार्यक्रमाच्या ठिकाणापासून दोन किलोमीटर अंतरापर्यंत रेड झोन किंवा नो फ्लाय झोन घोषित करण्यात आला आहे. या परिसरात दोन पॅराग्लायडर व मानव रहित हवाई उपकरणे उडविण्यास निर्बंध असणार आहेत पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांच्यावर सुरक्षितेचे जबाबदारी असून सरसंचालकांच्या बेळगाव येथील वास्तव्याच्या वेळी कडक सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!