Uncategorized
Trending

बेळगाव जिल्हा न्यायालयाच्या आवारात पार्किंग विकासकामाचा शुभारंभ

जिल्हा व सत्र न्यायाधीश मनजुनाथ नायक आणि बार असोसिएशनचे अध्यक्ष बी.जे.गंगाई यांच्या हस्ते उद्घाटन

बेलगाम प्राईड/ बेळगाव येथील जिल्हा न्यायालयाच्या आवारात पार्किंग सुविधेच्या विकासकामाला आज सोमवार, दि. १२ रोजी सकाळी प्रारंभ करण्यात आला. बेळगावचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मनजुनाथ नायक आणि बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष बी. जे. गंगाई यांच्या हस्ते या विकासकामाचे उद्घाटन करण्यात आले.

या प्रसंगी बार असोसिएशनचे महासचिव सचिन आर. शिवण्णवर, उपाध्यक्ष पवन पाटील, व्यवस्थापन समितीच्या सदस्या सौ.दीपा हळप्पण्णवर, वसंत अक्केण्णवर तसेच समितीचे अन्य सदस्य उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ व कनिष्ठ वकीलही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्हा न्यायालयाच्या आवारातील पार्किंग व्यवस्थेचा विकास करण्याच्या दृष्टीने हे काम हाती घेण्यात आले आहे. या विकासकामामुळे न्यायालयात येणारे वकील, पक्षकार आणि इतर नागरिकांना पार्किंग सुविधेच्या दृष्टीने मदत होणार आहे.

विकासकामासाठी सहकार्य करण्याचे आवाहन

पार्किंग विकासकामाच्या पार्श्वभूमीवर संबंधित विकासकामाच्या परिसरात वाहने उभी करू नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे. वकील आणि न्यायालयात येणाऱ्या पक्षकारांनी या परिसरात वाहने पार्क न करता विकासकाम सुरळीतपणे पूर्ण होण्यासाठी सहकार्य करावे, अशी विनंती करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!