आराध्या पी. हिची स्केटिंग स्पर्धेत दुहेरी सुवर्णपदकांची कमाई!
राज्यस्तरीय स्पर्धेत ५०० व १००० मीटर प्रकारात प्रथम क्रमांक एसजीएफआय राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड होण्याची संधी

बेलगाम प्राईड/ बेळगाव कॅम्प येथील सेंट झेवियर्स हायस्कूलची विद्यार्थिनी आराध्या पी. हिने राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत २०२६-२७ मध्ये स्केटिंग प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करत दोन सुवर्णपदकांची कमाई केली आहे.
आराध्याने १४ वर्षांखालील मुलींच्या गटात (U-14) क्वाड स्केटिंगच्या ५०० मीटर आणि १००० मीटर या दोन्ही स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक पटकावत सुवर्णपदक मिळवले. कर्नाटक सरकारच्या सहकार्याने शालेय शिक्षण विभागाच्या उपसंचालकांनी या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत आराध्याने उत्कृष्ट कौशल्यामुळे शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
या दुहेरी सुवर्णपदक विजेतेपदानंतर आराध्या आता एसजीएफआय (SGFI) राष्ट्रीय स्पर्धेत आपल्या कौशल्याची चमक दाखवण्यासाठी सज्ज होत आहे. आराध्याच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सेंट झेवियर्स हायस्कूलचे बिशप, संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्य आणि शिक्षकवृंद यांनी तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.




