
बेलगाम प्राईड/ शहरातील रस्त्यावरील अडथळे व वाहतुकीस निर्माण होणाऱ्या समस्यांबाबत बेळगाव महानगरपालिकेच्या प्रभारी आयुक्त लक्ष्मी निप्पाणिकर यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार दाखल करण्यात आली.
या तक्रारीच्या वेळी सिद्धार्थ नागणूर, ॲड.श्रीधर मुतकेकर, राजू चंद्रशेखरप्पा, दिव्यानंद कातगाळकर, परशुराम तलवार, अभिनंदन मोक्षी, भीमाप्पा बी., संपत सी., तुकाराम यांच्यासह इतर नागरिक उपस्थित होते.
रस्त्यावरील अडथळे दूर करून नागरिकांना व वाहनधारकांना सुरळीत ये-जा करता यावी, यासाठी संबंधितांनी महापालिका प्रशासनाने तातडीने योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी केली.




