Uncategorized
Trending

बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या वतीने डॉ.नीता देशपांडे यांचा सत्कार

बेलगाम प्राईड/ बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीतर्फे डॉ. नीता देशपांडे यांचा सत्कार करण्यात आला.गेली 10 वर्षे डॉ. देशपांडे या संघाला बहुमोल मदत करीत आहेत. वार्षिक सर्वसाधारण सभेचे औचित्य साधून डॉ. देशपांडे यांचा सत्कार अध्यक्ष विश्वास धुराजी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी डॉ. नीता देशपांडे यांनी भविष्यातही सहकार्य कायम राहील याची ग्वाही दिली. 

यावेळी सेट्रा केअरतर्फे डॉ. शाहनाज पटेल यांनी हृदयविकाराचा झटका यासंदर्भात घ्यावयाची काळजी व उपचाराची सखोल माहिती दिली व उपस्थितांच्या विविध शंकांचे निरसन केले.

यावेळी उपाध्यक्ष के.एल.मजूकर व शोभा हतरकी यांनी 75 वर्षे पूर्ण केल्याबद्दल तसेच एन.जी. गाडगीळ ( सीए), खजिनदार विनिता बाडगी, नूतन कार्यकारिणी सदस्य उल्हास पानसे व बाळकृष्ण बिर्जे, माजी उपाध्यक्ष जवाहर देसाई, डॉ. शाहनाज पटेल यांचाही सत्कार धुराजी यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी व्यासपीठावर उपाध्यक्ष के एल मजूकर,कार्यवाह सुरेन्द्र देसाई, सहकार्यवाह शिवराज पाटील, खजिनदार विनिता बाडगी, कार्यकारिणी सदस्य विजय वाईगडे, विठ्ठल पोलो, वनिता जोशी, स्नेहलता जुवळी, उल्हास पानसे, बाळकृष्ण बिर्जे, प्रकाश कुडतरकर उपस्थित होते. स्वागत सुरेन्द्र देसाई यांनी तर शिवराज पाटील यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!