Uncategorized
Trending

केएचबी कॉलनी, महालक्ष्मी नगर व बसवन कुडची येथे आमदार आसिफ (राजू) शेठ यांचा जनता दरबार

बेलगाम प्राईड/ बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ (राजू) शेठ यांनी केएचबी कॉलनी, महालक्ष्मी नगर आणि बसवन कुडची परिसरात जनता दरबार आयोजित करून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. या जनता दरबाराच्या माध्यमातून नागरिकांना आपल्या नागरी तसेच स्थानिक समस्या थेट आमदारांसमोर मांडण्याची संधी मिळाली.

यावेळी आमदार राजू शेठ यांनी नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधत त्यांच्या तक्रारी व समस्या जाणून घेतल्या. परिसरातील मूलभूत सुविधा, पायाभूत विकासकामे तसेच विविध नागरी समस्यांबाबत नागरिकांनी आमदारां समोर आपली मते मांडली.

नागरिकांनी मांडलेल्या समस्या संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देऊन त्यावर आवश्यक ती कार्यवाही प्राधान्याने करण्यात येईल, अशी ग्वाही आमदार राजू शेठ यांनी दिली.

“नागरिकांशी नियमितपणे थेट संवाद साधणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे परिसरातील समस्या प्रत्यक्ष पातळीवर समजून घेता येतात आणि मतदारसंघातील प्रत्येक भागापर्यंत विकासकामे पोहोचविण्यास मदत होते,” असे आमदार आसिफ (राजू) शेठ यांनी सांगितले.

जनता दरबारात मांडण्यात आलेल्या प्रश्नांवर योग्य तो तोडगा निघेपर्यंत संबंधित विभागांकडे पाठपुरावा सुरू ठेवणार असून, नागरिकांसाठी आपण सातत्याने उपलब्ध राहणार असल्याचेही आमदार असिफ शेठ यांनी स्पष्ट केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!