Uncategorized
Trending

यल्लम्मा देवस्थान प्राधिकरणाच्या कार्यदर्शीपदी राजश्री जैनापूरे

बेलगाम प्राईड/ लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या यल्लम्मा देवस्थान विकास प्राधिकरणाची रचना झाल्यापासून आजतागत तीन ते चार अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. राज्य सरकाराने रविवारी यल्लम्मा देवस्थान प्राधिकरणच्या कार्यदर्शी प्रभावती फकीरपूर (केएएस) यांची तडकाफडकी बदली केली असून त्यांच्या जागी राजश्री जैनापूरे (केएएस) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आपण प्रामाणिकपणे रेणुका देवीची सेवा करू तसेच सौंदतीचे आमदार डॉ. विश्वास वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन यल्लम्मा डोंगराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करण्याचे त्यांनी सांगितले. सोमवारी त्यांनी पदभार स्वीकारला.सौंदत्ती देवस्थानचा पदभार स्वीकारल्यानंतर राजश्री जैनापूरे यांचा सत्कार करण्यात आला.

भाविकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून स्वच्छतेला प्राधान्य देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी मंदिराच्या उपसचिव नागरत्ना चोळीन, शीतल कडट्टी, अल्लमप्रभू प्रभुनवर, वीरेश बॅहट्टी, आर. एस. सौदत्ती, सिद्धनगौडा पाटील आणि मंदिर कर्मचारी उपस्थित होतें.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!