बेळगावमध्ये ११ नोव्हेंबर रोजी ‘अस्मिता वेटलिफ्टिंग लीग २०२६-२७’ स्पर्धेचे आयोजन
महिला वेटलिफ्टिंग खेळाडूंना कौशल्य दाखविण्याची संधी; तीन गटांत होणार स्पर्धा

बेलगाम प्राईड/ भारतीय वेटलिफ्टिंग महासंघ आणि भारतीय क्रीडा प्राधिकरण (SAI) यांच्या मार्गदर्शनाखाली कर्नाटक राज्य वेटलिफ्टिंग असोसिएशनतर्फे ‘अस्मिता’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
महिला खेळाडूंना वेटलिफ्टिंग क्रीडा प्रकारात प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ‘अस्मिता वेटलिफ्टिंग लीग २०२६-२७’ ही स्पर्धा बेळगाव येथे आयोजित करण्यात आली आहे. बेळगाव जिल्हा वेटलिफ्टिंग असोसिएशनच्या वतीने भारतेश एज्युकेशन ट्रस्टच्या अरिहंतगिरी कॅम्पस, जुना पी. बी. रोड, किल्ल्याजवळ, बेळगाव येथे बुधवार, दि. ११ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ९ वाजल्यापासून या स्पर्धेला प्रारंभ होणार आहे.
या स्पर्धेत युथ गर्ल्स, ज्युनिअर वुमन आणि सिनिअर वुमन अशा तीन गटांचा समावेश करण्यात आला आहे. बेळगाव शहरातील पात्र महिला वेटलिफ्टिंग खेळाडूंना या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे.स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या खेळाडूंनी खेलो इंडिया (Khelo India) च्या अधिकृत पोर्टलवर आपली नोंदणी करणे आवश्यक आहे.
या संधीचा लाभ घेऊन महिला खेळाडूंनी आपले क्रीडा कौशल्य आणि सामर्थ्य दाखवावे, असे आवाहन बेळगाव जिल्हा वेटलिफ्टिंग असोसिएशनच्या सचिव सौ. नीता गंगारड्डी यांनी केले आहे.अधिक माहितीसाठी संपर्क : श्री. प्रदीप जुवेकर (क्रीडा संचालक) मो. ९९८६४४६४७८