कर्नाटक राज्यस्तरीय मिनी क्रीडाकूट स्पर्धेत बेळगावच्या अर्णा होसमनीची वेटलिफ्टिंगमध्ये निवड

बेलगाम प्राईड/ येथील केएलई इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थिनी कु. अर्णा अभिषेक होसमनी हिने वेटलिफ्टिंग (वेटलिफ्टिंग क्रीडा प्रकार) मध्ये उल्लेखनीय कामगिरी करत कर्नाटक राज्याच्या पाचव्या मिनी क्रीडाकूट स्पर्धेत प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळविला आहे.
बंगळूर येथील प्रसिद्ध कांतीरवा स्टेडियमवर आयोजित करण्यात येणाऱ्या या राज्यस्तरीय स्पर्धेत अर्णा बेळगावचे प्रतिनिधित्व करणार आहे. शालेय स्तरावरून राज्यस्तरीय स्पर्धेपर्यंत मजल मारल्याने तिच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
अर्णाच्या या निवडीमुळे केएलई इंटरनॅशनल स्कूलच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. तिच्या या यशाबद्दल शाळेचे व्यवस्थापन, प्राचार्य, शिक्षकवर्ग तसेच क्रीडाप्रेमींनी अभिनंदन केले असून, आगामी स्पर्धेसाठी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. अर्णाने वेटलिफ्टिंगमध्ये अशीच उत्कृष्ट कामगिरी करून बेळगावचे नाव राज्यस्तरावर उज्ज्वल करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.




