
बेलगाम प्राईड/ बेळगाव शहरात थंडीचा जोर दिवसेंदिवस वाढत असून, गुरुवारी सकाळी किमान तापमानाचा पारा १२ अंश सेल्सिअसपर्यंत घसरला. सरासरी तापमानाच्या तुलनेत तब्बल ४.४ अंशांनी तापमानात घट झाल्याने शहरात नोव्हेंबर महिन्यातच हिवाळ्याची तीव्र चाहूल लागली आहे.
बुधवारच्या तुलनेत गुरुवारी किमान तापमानात ४.४ अंश सेल्सिअसची घसरण नोंदवण्यात आली. त्यामुळे पहाटे आणि सकाळच्या वेळी थंडीचा अधिक जाणवू लागली आहे. दरम्यान, बेळगावातील आतापर्यंतचे सर्वात कमी तापमान ७.७ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले असून, १८ नोव्हेंबर २०१२ रोजी हा विक्रम नोंदवण्यात आला होता.
यंदा नोव्हेंबरच्या सुरुवातीलाच तापमानात मोठी घट झाल्याने आगामी दिवसांत थंडीचा कडाका आणखी वाढण्याची शक्यता आहे.
तापमानाची नोंद :
* आजचे किमान तापमान : १२°C
* मागील दिवसाच्या तुलनेत घट : ४.४°C
* आतापर्यंतचे नीचांकी तापमान : ७.७°C
* नीचांकी तापमानाची तारीख : १८ नोव्हेंबर २०१२




