Uncategorized
Trending

पापी पतीने माहेरच्या लोकांना जाळून मारण्याचा अमानुष कृत्य

बेलगाम प्राईड/ पतीच्या घरातील सततच्या भांडणाला कंटाळून माहेरी गेलेल्या पत्नी व तिच्या कुटुंबीयांवर पतीने पेट्रोल ओतून आग लावून खून करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना अथणी तालुक्यातील तेलसंग गावात उशिरा उघडकीस आली आहे.

ही घटना दि. १० डिसेंबर रोजी घडली. भीमा भोसले असे आरोपी पतीचे नाव असून तो अथणी तालुक्यातील यलिहडळगी गावचा रहिवासी आहे. पतीचा छळ सहन न झाल्याने पत्नी माहेरी गेली होती. याच रागातून भीमाने तिच्या माहेरच्या घरी जाऊन पेट्रोल ओतून आग लावत पत्नी व तिच्या कुटुंबीयांचा खून करण्याचा प्रयत्न केला.

“मी नको म्हणालो असतानाही तुम्ही माझ्या पत्नीला माहेरी कसे घेऊन गेलात?” या संतापातून आरोपी पतीने पत्नीच्या माहेरच्या घरी जाऊन घरात उपस्थित असलेल्या ६ जणांवर पेट्रोल ओतून खून करण्याचा प्रयत्न केला.

या घटनेत संजू साळुंके, शंकर साळुंके, कृष्णा साळुंके, अंकुश पडतारे, मनोहर पडतारे आणि पत्नी राणी भोसले हे गंभीर जखमी झाले आहेत. सध्या सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी आईगळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!