Uncategorized
Trending

वृषाली उर्फ सई शेखर पाटील यांना डॉ.पदवी बहाल

बेलगाम प्राईड/ कर्नाटक हेल्थ इन्स्टिट्यूट, घटप्रभा येथील प्राध्यापिका प्रा. वृषाली उर्फ सई शेखर पाटील यांनी “कर्नाटकातील निवडक रुग्णालयांमध्ये बाह्यरुग्ण विभागात येणाऱ्या उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांमध्ये आढळलेल्या जीवनशैलीतील बदलांबाबत होणाऱ्या परिणामांचे निरीक्षण व अध्ययन” (मेडिकल सर्जिकल नर्सिंग) या विषयावर संशोधन करून डॉक्टरेट पदवी संपादन केली आहे. ही डॉक्टरेट पदवी त्यांनी मध्य प्रदेशातील मालवांचल विद्यापीठ, इंदोर येथून मिळविली असून हे विद्यापीठ भारतीय परिचारिका परिषद (Indian Nursing Council) मान्यताप्राप्त आहे.

यापूर्वी त्यांनी कर्नाटकातील राजीव गांधी वैद्यकीय विद्यापीठातून एम.एस्सी. नर्सिंग पदवी प्राप्त केली होती. त्यानंतर बेळगाव शहरातील विविध रुग्णालयांमध्ये वरिष्ठ नर्स म्हणून त्यांनी कार्य केले. नोकरी करत असतानाच त्यांनी उच्च रक्तदाबग्रस्त रुग्णांच्या जीवनशैलीतील बदलांवर सखोल अभ्यास करून प्रबंध सादर केला. या संशोधनाच्या आधारे त्यांना डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली.

प्रा. सई पाटील यांनी सुरुवातीपासूनच वैद्यकीय क्षेत्रातील विविध विभागांत कार्य करून समृद्ध अनुभव मिळविला आहे. त्या स्व. प्रा. सी. व्ही. पाटील यांच्या स्नुषा आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय शैक्षणिक यशाबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!