Uncategorized
Trending

महिला शक्तीला सलाम; ८ मार्चला जिल्हा क्रीडांगणावर आंतरराष्ट्रीय महिला दिन सोहळा

बेलगाम प्राईड / कर्नाटक शासनाच्या युवक सक्षमीकरण व क्रीडा विभाग (DYES), बेळगाव यांच्या वतीने ८ मार्च २०२६ रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी ३.०० ते सायं. ६.०० या वेळेत नेहरू नगर येथील जिल्हा क्रीडांगणावर हा सोहळा पार पडणार असून, बेळगाव जिल्ह्यातील महिलांमध्ये महिला सक्षमीकरण, क्रीडा व स्वसंरक्षणाबाबत जागरूकता निर्माण करणे हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

कार्यक्रमात स्वसंरक्षण जागृती सत्राचे आयोजन करण्यात आले असून, त्यामध्ये महिलांना मूलभूत स्वसंरक्षण तंत्रे तसेच सुरक्षिततेसंदर्भातील महत्त्वपूर्ण मार्गदर्शन दिले जाणार आहे. यासोबतच १८ ते ४० वर्षे आणि ४० वर्षांवरील वयोगटांसाठी ५० मीटर धावणे, १०० मीटर धावणे, गोळाफेक आणि दोरीखेच (गट स्पर्धा) अशा विविध क्रीडा स्पर्धा घेण्यात येणार आहेत. स्पर्धांतील विजेत्यांना ट्रॉफी, पदके व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात येणार आहे.

हा उपक्रम डीवायईएसचे जिल्हा उपसंचालक श्रीनिवास यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात येत आहे. ज्यूडो प्रशिक्षक रोहिणी पाटील आणि कुतुजा मुलतानी यांनी बेळगाव जिल्ह्यातील सर्व महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन केले आहे.

“सशक्त महिला, सशक्त राष्ट्र” हा संदेश देत महिला शक्तीचा उत्सव साजरा करण्यासाठी हा कार्यक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!