Uncategorized
Trending

अल्पवयीन मुलीवर अत्याचार : आरोपीला २० वर्षांची सक्तमजुरी शिक्षा सुनावली

बेलगाम प्राईड/ अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली बेळगावच्या विशेष जलदगती न्यायालयाने हुक्केरी तालुक्यातील हुलोळहट्टी येथील आरोपी सख्याप्पा उर्फ सचिन धुंडाप्पा शिंगाई या २६ वर्षीय तरुणाला २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.

हुक्केरी पोलीस ठाण्यात २०२२ मध्ये या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अनुसूचित जातीतील अल्पवयीन मुलीला आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला होता. या प्रकरणाचा तपास गोकाकचे डीवायएसपी मनोजकुमार नाईक यांनी केला आणि बेळगावच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र विशेष जलदगती न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

न्यायाधीश सी. एम. पुष्पलता यांनी ६ साक्षीदार, ५९ कागदपत्रे आणि १३ पुराव्यांच्या आधारे आरोपीला दोषी ठरवले. आरोपीला पॉक्सो कायद्याच्या कलम ६ अंतर्गत २० वर्षे सक्तमजुरी आणि १ लाख रुपये दंड, तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत १० वर्षे सक्तमजुरी आणि ५० हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे.

न्यायालयाने पीडित मुलीला जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून ४ लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.ही रक्कम राष्ट्रीयीकृत बँकेत १५ वर्षांसाठी मुदत ठेव म्हणून ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले. या प्रकरणात विशेष सरकारी वकील एल. व्ही. पाटील यांनी सरकार पक्षातर्फे प्रभावीपणे युक्तिवाद केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!