Uncategorized
Trending

हिडकल जलाशयात पोहायला गेलेल्या दोन मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू

बेलगाम प्राईड/३१/३/२०२६ शाळेला सुट्टी लागल्याचा आनंद साजरा करण्यासाठी हिडकल जलाशयाच्या बॅकवॉटरमध्ये पोहायला गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना हुक्केरी तालुक्यातील हळेगुडनट्टी गावाजवळ घडली. 

उन्हाळी सुट्टीच्या पहिल्याच दिवशी दोन घरांचे दिवे विझल्याने संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. ददाबानट्टी येथील आर.सी. सेंटर गावातील पाच मित्र मिळून सोमवारी दुपारी कडाक्याच्या उन्हात पाण्यामध्ये मौजमजा करण्यासाठी हळेगुडनट्टी येथील देवस्थानाजवळ असलेल्या हिडकल जलाशयाच्या बॅकवॉटरमध्ये पोहायला गेले होते.

मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने कृष्णा विठ्ठल खानापुरे (१४) व प्रज्वल गोकार (१४) हे दोन तरुण पाण्यात उतरले असता खोल पाण्यात ओढले गेले. सोबत असलेल्या इतर तिघांनी आरडाओरड केली पण पाण्याचा प्रवाह आणि खोली जास्त असल्याने या दोघांना वाचवता आले नाही.

घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन शोधमोहीम राबवली आणि दोन्ही मुलांचे मृतदेह बाहेर काढले. हसत्या-खेळत्या मुलांचे पार्थिव घरी येताच पालकांनी केलेला आक्रोश हृदयद्रावक होता.या घटनेचा गुन्हा पोलीस स्थानकात नोंद झाला आहे.

मुलाने नदीपात्रात किंवा कुठल्याही पाण्याच्या भागात उतरताना धोका पत्करू नये त्याची दखल घ्या असे आवाहन पोलीस विभागांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!