Uncategorized
Trending

27 व्या राष्ट्रीय कर्णबधिर वरिष्ठ जलतरण स्पर्धेत उमेश खाडे चमकला

बेलगाम प्राईड/ बेळगाव स्विमर्स क्लब आणि अक्वेरियस स्विम क्लबचा जलतरणपटू उमेश खाडे याने ऑल इंडिया स्पोर्ट्स कौन्सिल ऑफ द डेफ (एआयआयएमडी) यांच्यातर्फे आयोजित 27 व्या राष्ट्रीय कर्णबधिर वरिष्ठ जलतरण स्पर्धेमध्ये सुवर्ण पदकासह एकूण 4 पदकांची कमाई करत आपली चमक दाखवली.

सदर स्पर्धा गुजरात विद्यापीठ क्रीडा मैदान, नवरंगपुरा आणि उस्मानपुरा जलतरण तलाव, अहमदाबाद, गुजरात येथे नुकतीच पार पडली. या स्पर्धेत उमेश खाडे याने 1 सुवर्ण, 2 रौप्य आणि 1 कांस्य पदक जिंकले. उमेश याने गेल्या 5 वर्षांपासून स्पर्धांतील राष्ट्रीय विक्रम आपल्या नावावर ठेवले आहेत. त्याने यावेळी मिळविलेले यश  200 मी. ब्रेस्टस्ट्रोक : सुवर्ण पदक, 50 मी. ब्रेस्टस्ट्रोक : रौप्य पदक, 100 मी. ब्रेस्टस्ट्रोक : रौप्य पदक, 400 मी. फ्रीस्टाईल : कांस्य पदक. अशा या विभागातून आपली यश प्राप्त करून घेतली आहे.

उमेश खाडे हा केएलईच्या सुवर्ण जेएनएमसी ऑलिम्पिक आकाराच्या जलतरण तलाव, बेळगाव येथे जलतरण गुरु उमेश कलघटगी, प्रशिक्षक अक्षय शेरेगर, अजिंक्य मेंडके, नितीश कुडूचकर, गोवर्धन काकतकर आणि इम्रान उचगावकर यांच्या समर्पित मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहे. त्याला डॉ. प्रभाकर कोरे (केएलई सोसायटी), जयंत हुंबरवाडी (अध्यक्ष, जयभारत फाउंडेशन), दिलीप चिटणीस (अध्यक्ष पॉलिहायड्रॉन फाऊंडेशन), राम मल्ल्या (सीएमडी, अलायड फाऊंडर्स बेळगाव), एसएलके ग्रुप, बंगलोर, डॉ. नितीन खोत, रो. अविनाश पोतदार, श्रीमती मानी कपाडिया, श्रीमती लता कित्तूर, सुधीर कुसाने, प्रसाद तेंडोलकर आणि इतरांचा पाठिंबा व प्रोत्साहन मिळत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!