
बेलगाम प्राईड/ महालक्ष्मी यात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडून नये, यात्रा सुरळीत आणि शांततेत पार पाडावी यासाठी यात्रा काळात चोख पोलीस बंदोबस्त ठेवला जाईल, शिवाय यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करा, असे आवाहन काकती पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक सुरेश शिंगी यांनी केले.
सोमवारी हंदीगनुर येथील कलमेश्वर मंदिर मध्ये यात्रा उत्सव कमिटी आणि ग्रामस्थांची बैठक झाली. यावेळी पोलीस निरीक्षक सिंगी यांनी मार्गदर्शन केले.
हंदिगनुरसह, कुरीहाळ, म्हाळेनट्टी, कट्टणभावी, बोडकेनहट्टी, होसोळी गावच्या महालक्ष्मी यात्रेला 14 एप्रिल पासून प्रारंभ होणार आहे. या पार्श्वभूमीवर यात्रा शांततेत पार पाडावी यासाठी पोलीस निरीक्षक सुरेश सिंगी यांनी हंदिगनूर गावाला भेट देऊन यात्रा तयारीचा आढावा घेतला. शिवाय पार्किंग व्यवस्था, वीजपुरवठा आणि पाण्याची व्यवस्था याबाबत माहिती करून घेतली. तसेच पार्किंग च्या जागेची पाहणी करून त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त देण्याचे आश्वासन दिले.
अवघ्या आठ ते दहा दिवसांवर महालक्ष्मी यात्रा आल्याने गावात उत्साहाचे वातावरण पहावयास मिळत आहे. 14 ते 22 एप्रिल दरम्यान ही यात्रा चालणार आहे. यात्रेसाठी आकर्षक असा 33 कोटी रथ तयार करण्यात आला आहे
तब्बल ५८ वर्षानंतर होणाऱ्या यात्रेसाठी ग्रामस्थ आणि भाविकांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर भव्य सभामंडप उभारणीसह इतर कामेही अंतिम टप्प्यात झाली आहेत. शिवाय यात्रा काळात कोणतीही गैरसोय होणार नाही, याची दक्षता यात्रा उत्सव कमिटीतर्फे घेतली जात आहे.
लक्ष्मी यात्रोत्सव कमिटीचे अध्यक्ष गंगाधर पाटील, कल्लाप्पा कडोलकर, भैरवनाथ पाटील, दयानंद पाटील, मारुती पाटील, पुंडलिक पाटील, महेश पाटील, आनंद पाटील, किरण पाटील, बाळू तळवार, विजय कांबळे, मारुती मोरे लक्ष्मण पाटील, शिवाजी कुराडे, भावकु चौगुले, सुभाष सुतार, संतोष सुतार, शटूप्पा रामनकट्टी, पुंडलिक कांबळे यास ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.




