Uncategorized
Trending

मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळात निवड प्रक्रियेवरून वाद; फेरनिवडीची मागणी

बेलगाम प्राईड/ मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव मंडळाच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून सध्या वादाचे वातावरण निर्माण झाले असून एकीकडे राजीनामा सत्र सुरू असतानाच दुसऱ्या बाजूला काही सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत फेरनिवडीची मागणी केली आहे.

सागर पाटील, दत्ता जाधव आणि बळवंत शिंदोळकर यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रामध्ये ५ एप्रिल रोजी झालेल्या निवड प्रक्रियेच्या कारभारावर तीव्र रोष व्यक्त करण्यात आला आहे. निवड प्रक्रियेत पारदर्शकता नसल्याचा आरोप करत त्यांनी बैठक बोलावण्याच्या अधिकारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

सदस्यांच्या सूचना व मतांना दुजोरा न देता एकतर्फी निर्णय घेत अध्यक्षपदासाठी नाव जाहीर करण्यात आल्याचा आरोप संबंधित सदस्यांनी केला आहे. या प्रकारामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

दरम्यान, सदर निवड प्रक्रियेवर बहिष्कार टाकत नव्याने निवड प्रक्रिया राबवावी, सर्व कार्यकर्त्यांचे मत जाणून घेतल्यानंतरच अध्यक्षांची नियुक्ती करावी, अशी मागणी संबंधित सदस्यांनी पत्राद्वारे केली आहे. आगामी काळात यावर काय तोडगा निघतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!