
बेलगाम प्राईड / लोंढा एज्युकेशन सोसायटीच्या लोंढा हायस्कूल लोंढा येथे मुख्याध्यापक श्री एन. डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पालक सभा संपन्न झाली. सदर सभेत एल. बी. ए. या नव्या पाठाधारीत मौल्यांकन पद्धतीची माहिती देण्यात आली. या बदललेल्या मौल्यांकन पद्धतीमध्ये पालकांच्या भूमिकेचे महत्त्व पालकांना पटवून देण्यात आले. त्याचप्रकारे विद्यार्थ्यांच्या विकासासाठी संस्था व शिक्षकांचे प्रयत्न विशद करून पालकांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
याप्रसंगी मोबाईलचे दुष्परिणाम, विद्यार्थ्यांच्या साठी विशेष वर्ग ,अभ्यासाचे वेळापत्रक इत्यादी विषयावर मुख्याध्यापक श्री एन. डी. पाटील, सहशिक्षक श्री एम. एस. कपलेश्वरी यांनी पालकांना मार्गदर्शन केले. या सभेस मोठ्या संख्येने पालक व सहशिक्षक एस. बी.गावडा आर.एम.बांदी, जे.पी.कुगजी, सी.आर.संबरगी, सौ. ए.आर.नाईक, एस.पी.चौरी, व जाफर पटेल कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार ज्येष्ठ शिक्षक श्री. एन. व्ही. गावडे यांन मानले.




